*समर्थांचे साहित्यविश्व*16-10-2020

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विवेक हा भला भला..|*
*उदंड राम देखिला..|*
*पदी अनन्य मीळणी..|*
*उरी नसे दुजेपणी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

सद्विवेकबुद्धीने भारलेल विचारीपण म्हणजे विवेक.समसमा बुद्धि.आणि हा प्राप्त होतो रामकृपेमुळी. मनात कृतिशील परमार्थ उभा राहतो तोच खरा विवेक..!

समर्थ रामदास म्हणतात...

अशा विवेकबुद्धीने रामाच्या चरित्रामधील अनेक छटा अनुभवता येतात.राम जो  सर्वस्पर्शी आहे,सर्वसाक्षी आहे..!असा राम पहाण, त्याच संकीर्तन करणं,त्याची उपासना करणं.किती आल्हाददायक आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा राम आपल्याला त्याच्यात सामावून घेतो.आपण त्यात इतके समरस होतो की तो आत्माराम आपल्याला  मनापासून तनापर्यंत आपल्यात दिसू लागतो.

समर्थ रामदास म्हणतात..

अशी राममय वृत्ती झाली की तो राम आणि आपण  रामदास यांच्यात वेगळेपण रहातच नाही.पिंडी ते ब्रम्हांडी अशी अवस्था होऊन जाते.आणि पूर्ण  आयुष्याचा रघुराज होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी.सातारा
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment