समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*नवस हरिकथेचे राम भक्ती करावे..|*
*कठिण विषम काळी मम जीवी धरावे..|*
*विविध सकळ काही दोष नासुन जाती..|*
*रघुविरभजने हो कामना पूर्ण होती..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामभक्तीने भारून गेलेल्या आयुष्यात कामना,इच्छा फक्त हरिकथेची, रामसंकीर्तनाची करावी..!त्यासाठीचे नवस हे भक्ती सुदृढ होण्यासाठी  रामरायांच्या चरणी सदोदित करावे.

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या आयुष्यातील अनेक विषम काळ,दुःखाने हरवून गेलेले काही प्रसंग,काही विरुद्ध असे घटनाक्रम अशा काळी रामराया तू मला तुझ्या हृदयापाशी धरून ठेव.

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या हातून होत असलेल्या या तुझ्या संकीर्तनाने माझ्या मनात साठलेले सारे दोष,किल्मिष निरसन होऊन मन अगदी शुद्ध होऊन जाईल.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा भक्तीपंथात,परमार्थात एकच इच्छा राहते ती म्हणजे रघुवीर दर्शनाची,मुक्तीची ती ही या संकीर्तनाच्या आवडीने, व्रताने पूर्ण होऊन आयुष्य कृतार्थ होते.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विषम गति मनाची ते मला आवरेना..|*
*शरीर विकळ कामे ते कदा सावरेना..|*
*सुख दुःख मज माझे वाढिले तेची जेऊ..|*
*रघुपती.!तुजला रे कासया बोल ठेऊ..?||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

मनाने खर म्हणजे जन्म मरणाच्या मुक्ततेते कडे जावे.आपले स्वहित करावे.मनुष्यजन्माचे सार्थक साधून देवचरणी कायमचे गढून जावे.

समर्थ रामदास म्हणतात..

शरीर ऐहिक भावनांच्या अतिरेकाने,त्याच्या विचाराने अतिशय गलितगात्र झालं आहे की जे सावरायचा प्रयत्न केला तरी सावरता येत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या कर्म गतीने मला सुखदुःखाने युक्त असे आयुष्य दिले आहे.ते जगणे,ते व्यतीत करणे हे माझे कर्तव्य आहे.त्याचे फलित आनंद असो किंव्हा विषाद असो.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया,हे सगळं माझं संचित आहे.माझी कर्मरेखा आहे.माझ्या पूर्वजन्मीचा आणि आजच्या चालू जन्माच्या कर्मानुसार भोग मी स्वतः ओढून घेतले आहेत.त्याबद्दल तुला मी कधीच दोष देत नाहीये..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*शमशम विषयांची काही केल्या शमेना..|*
*अचपळ मन माझे साजणी हे दमेना..|*
*अनुदिन मज पोटी दुःख तेही वमेना..|*
*तुजविण जगदीशा वेळ तोही गमेना..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

विषयांची प्रदीर्घ वखवख ही आयुष्याला पुरून उरत चालली आहे.त्या विषयांचा  अंत हा दृष्टिला कुठेही दिसत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

या विषयांच्या कर्दमात मन अडकून राहू लागल आहे.आणि ते इतक्या वेळा गुंतून ही त्यातून अलग होत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्याची परिणीती मन अतिशय मनात वैषम्याची स्थिती निर्माण होत असली तरी त्याचे निरसन मी करू शकत नाहीये.ते दुःख त्याग करू शकत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सगळं आहे पण तुझ्या अस्तित्वाशिवाय मला कोठेही मन रमवता येत नाहीये.त्यामुळे परम सुखाची परमार्थाची प्राप्ती ही होत नाहीये.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*हरि हरि दुरिते तो स्वामी वैकुंठराजा..|*
*सुरवर नर पाळी शोभती चारी भुजा..|*
*झळफळीत किळा हे हेमरत्नांबराचा..|*
*परम कुशळ शोभे नाथ लोकत्रयाचा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

तो हरि नाव धारण करणारा,दुरितांचे दूरत्व हरण करणारा हा वैकुंठाच्या सिंहासनावर आरूढ झालेला महाविष्णू केवळ अगाध स्वरूपी आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

इंद्रादी देवतांनाही जो पूज्य असा तो चतुर्भुजधारी  महाविष्णू अतिशय मनोहर असा दर्शन देणारा देवाधिदेव आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या महाविष्णूच्या वास्तव्याच ठिकाण हे सोन्याच्या महिरपी,रत्नांची जडवणूक आणि रजताच्या आकाशाचा आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा अतिशय प्रेमळ आणि सकलकल्याणकारी असा देव तिन्ही लोकांचा त्राता होऊन इथे आधिष्ठीत होऊन राहिला आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विगळीत मन माझे तू करी देवराया..|*
*हरिभजन कराया पाहिजे दृढ काया..|*
*निरूपण विवराया तर्कपंथेचि जाया..|*
*रघुपतिगुणछाया चित्त माझे निवाया..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया, तू माझे मन इतके निरिच्छ कर की ते त्रिगुणविरहित,वासनाहीन होऊन कल्पनाऔदासिन्याने भरून जाऊ दे.ते एक निश्चल असे बेट होऊ दे.

समर्थ रामदास म्हणतात..

हरिसंकीर्तन करायचे असेल तर मन आधी देवाचे झाले पाहिजे.त्यासाठी दृढतेने फक्त भक्तीची कास आणि आस अतिशय आग्रहाने माझ्या शरीराने,मनाने आपलीशी केली पाहिजे.

समर्थ रामदास म्हणतात..

देवलीला असलेल्या आगम-निगम कथा समजून घ्यायच्या तर निरुपणाचा वाचिक आणि श्रवणीक ध्यास हा असला पाहिजे.आणि त्याची तर्कसंगत मांडणी आणि विवेचन मनातल्या मनात करता आलं पाहिजे.आणि समाजामध्ये प्रभावी पद्धतीने मांडता आल पाहिजे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सगळे झाले की रामरायाच्या अनेक लिलायुक्त कहाण्या आणि त्यातून प्रतीत होणारे त्याचे गुणवैभव पाहून,ऐकून माझं मन एक शांत असा नदीचा प्रवाह होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विषयविष वमावे कल्पनेला दमावे..|*
*निजपद निजभावें दृढ चित्तीं धरावे..|*
*भवभय निरसावे साधुसंगी वसावे..|*
*सगुणभजन द्यावे स्वामी देवाधिदेवें..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

परमार्थाच्या दृष्टीने,सकल कल्याणाच्या दृष्टीने बाधक असा जो विषयसुख नावाचा एक हलहलाचा घोट आहे जो माझ्याकडुन घेतला जातो त्याचा माझ्याकडून शारीरिक,मानसिक त्याग होऊ दे..!अशा क्षणिक सुखांची कल्पना,वासना याचे चिंतन करण्याचा वीट मला येऊ दे..!

समर्थ रामदास म्हणतात..

एक असे अढळ निश्चिन्त जन्ममरणाच्या फेऱ्याला चुकवणारे मानसिक स्थान मिळवण्याचा कायमचा ध्यास या रामकृपेने मला मिळेल अशी कायम श्रद्धा मनात ठेवून तेच ध्येय असू द्यावे.

समर्थ रामदास म्हणतात..

भवभय नावाचे जे दुःख  उत्पन्न करणारे मनाचे खेळ आहेत ते सज्जनसंगत,साधूसंगत, गुरुसंगत या उपायांनी कायमचे आयुष्याच्या पल्याड सोडून केवळ रामभक्ती, संकीर्तन यासाठी या महानुभावांच्या संगतीत काळ व्यतीत करावा.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सर्व साधण्यासाठी हे रामराया मला सगुणभजन,संकीर्तन आणि भक्ती करण्याचा वसा मला आशिर्वाद रूपाने मला दे कारण तूच माझा कर्ता,पालनकर्ता असा स्वामी आहेस.कारण तू आम्हा सकलांचा देवाधिदेव आहेस.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*वणवण ही विषयांची सर्वथाही शमेना..|*
*अनुदिन मोहमाया लागली हे तुटेना..|*
*झडकरी मज रामा सोडवी पूर्णकामा..|*
*तुजवीण गुणधामा कोण रक्षील आम्हा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

आयुष्यातले तापत्रय वाढवणारी ही विषयलोलुप वणवण..त्याची न संपणारी अतृप्त वखवख,रुक्ष भूक ही शांत होत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

प्रत्येक दिवशी नवीन मोह,नवीन वासना,नवीन मायेचे रूप..त्यातून जन्म घेणारे ऐहिक जन्ममरण याची साखळी तुटत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

आता मात्र रामराया तू सत्वर तुझी कृपा कर..तू ये आणि मला या वासना बंधनातून कायमचा मोकळा कर.मला तुझ्या पूर्ण अशा व्यक्तित्वात पूर्ण सामावून घे.

समर्थ रामदास म्हणतात..

आम्हाला मानसिक,शारीरिक त्राता तूच आहेस.तूच आमचा तारक आणि भवसागरातला वाहक आहेस.तुझ्याशिवाय कोणी हे करू शकेल असा समर्थ तरी कोण आहे..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२