समर्थांचे साहित्यविश्व*17 -10-2020

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विचार सार सारसा..|*
*करील कोण फारसा..|*
*बळे बळेचि नीवळे..|*
*कळे कळेचि आकळे..|*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

इतका सरळ भक्तिमय असा पंथ आहे या परमार्थाचा.रघुरायाला प्रसन्न करण्याचा.या पंथाला जायचा नुसता विचार ही सरळ सरळ मुक्तीची वाट दाखवून जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

पण प्रापंचिक लोकांना तेच थोडं अवघड जात.ते भक्तीचा विचार करायचा सोडून आसक्तीचा मोह मागे लावून घेतात.तो सोडून ही मुक्तीची वाट चोखाळणारे भाग्यवंत तसे कमीच..!

समर्थ रामदास म्हणतात..

अगदीच एखाद्या प्रापंचिकाने ह्या भक्तिमार्गाची निवड केली तर तो सर्व प्रथम बिचकतच या मार्गात येतो.आणि मग ही भक्तीसुद्धा काहीशा नाखुशीने स्वीकारतो.पण हळू हळू त्याचे फळ त्याला मिळू लागते.

समर्थ रामदास म्हणतात..

एकदा का ही गोडी लागली की सगळं आयुष्य रामरायांच्या कृपेने सुगम होऊ लागते.अनेक प्रश्न सुटू लागतात.विषयविवंचना निरसून जाऊ लागते.आयुष्य मंगल होऊन जाते.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी,सातारा
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment