समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लपावे अती आदरे रामरूपी..|*
*भयातीत निश्चिंत ये सस्वरूपी..|*
*कदा तो जनी पाहता ही दिसेना..|*
*सदा ऐक्य तो भिन्न भावे वसेना..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

आपण निश्चित या रामस्वरूपाच्या संकीर्तनात लपून जावे.आश्रय घ्यावा.कारण त्याची छाया असेल तर कोणतीही अपशक्ती आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

हे स्वरूप अतिशय कल्याणकारी आहे.ते मानवाला त्याच्या मनात येणाऱ्या प्रत्येक भीतीच्या पलीकडे घेऊन जाणार अत्यंत दिलासादायक अस मेघवर्णी रूप आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

जेंव्हा हे रामतत्व आपण शोधू लागतो ते आपल्या दृश्य चक्षूनी ते दिसू शकत नाही.ते आपण शोधू शकत नाही कारण ते आपल्यातच वसलेलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अस एकदा रामतत्वाशी तादात्म्य पावलो की त्याच भिन्न अस स्वरूप रहात नाही.कारण तो राम आणि आपण एकंकार होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लगा पाहता राघवेवीण नाही..|*
*निराधार हे पाहता सर्व काही..|*
*चळेना जनी तोचि आश्रो धरावा..|*
*रघुराज आधार त्याचा करावा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामरायाचा आश्वासक सहवास पाहता आधार ज्याला म्हणावा अस फक्त हाच असू शकतो.कारण हा रामराजा स्वतःचे अबाध्य ओज हे दासाच्या कल्याणासाठी सदा खर्च करत असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

एकदा रामरायांच्या या आधाराचा,साथीचा अनुभव घेतला की कळत यांच्याशिवाय कोणताही आधार हा मनुष्याच आत्मिक,भावनिक कल्याण करू शकत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया ज्या अचल,निग्रही स्वरूपात नेहमी दर्शन देतो तसाच त्याचा भक्ताच्या मागचा एक आधार ही असतो.असाच न ढळणारा आधार समस्त मनुष्याच्या  मागे असला पाहीजे.

समर्थ रामदास म्हणतात..

म्हणूनच रामरायाच्या नामाचा,संकीर्तनाचा आणि त्याच्या आशीर्वाद,एकरूपतेचा आधार मला कायम मिळत रहावा आणि चिरंतन टिकावा ही प्रार्थना..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लळे पाळीतो राम आम्हा दिनाचे..|*
*कृपासागरू भाव जाणे मनाचे..|*
*नुपेक्षी कदा संकटी घाव घाली..|*
*तया देखता मानसे ती निवाली..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज जेंव्हा येतो तेंव्हा वात्सल्याने मातापित्या सारखे माझे निरागस हट्ट पुरवतो.प्रेमाने निरसन करतो.मी कितीही त्याच्याकडे मागितल तरी तो माझी आवड पूर्ण करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज कृपावंत इतका आहे की तो माझ्या मनात उठणारे प्रत्येक तरंग  मनस्वी पणे जाणून घेतो आणि त्याची मला सुखकर अशी व्यवस्था करून देतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज कुठल्याही अपेक्षेविना माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निरसन करतो.त्याचे सुखात परिवर्तन होईल अशी माझी जीवनशैली करून देतो.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या रघुराजाचे दर्शन घेतले की मनातले विकल्प शांत होतात.ईच्छा तृप्त होतात.मन सफल सम्पूर्ण अवस्था प्राप्त करते. एक तृप्त शांतता मन भरून पावते.

समर्थ चाफळला येऊन वसणाऱ्या रामरायाच गुणगान करताना त्याच्या अस्तित्वाचा त्यांच्यावर किती हळुवार पण सुखकर परिणाम होतो हे सांगत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लवे नेत्रपाते स्फुरे आजि बाहे..|*
*दीनानाथ हा राम येणार आहे..|*
*जयाचेनि योगे सुखानंद लोटे..|*
*तया देखता अंतरी बाष्प दाटे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

डोळ्यांची पापणी लवते आहे.हा शुभसंकेत आहे.हे शुभवर्तमान येणारा काळ घेऊन येणार आहे.अचानक केवळ जाणिवेने बाहुत,गात्रात स्फुरण चढून ते हर्षोउन्मादीत होत चालले आहेत..!

समर्थ रामदास म्हणतात...

तो राम जो सर्वउद्गारक,सर्वतारक सर्वकृपाळू आहे,त्याच आगमन आता निश्चित आहे.हे या साऱ्या शुभशकुन आणि शुभचिंतनाने खर ठरत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

तो रामराय आला की सौख्याचे सोहळे सुरू होतात.सगुणरूपाचे संकीर्तन चालू होते.भक्तीसागरातून आनंदसागराचा प्रवास सुरु होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या रघुराजाचे केवळ मुख दर्शन घेतले की डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात.मन,हृदय भक्तीने उचळंबून येते.आणि अधीर होऊन स्निग्ध,मुलायम होऊन जाते.

चाफळला रामपंचायतानाची प्रतिष्ठापना होणार होती त्या आसपास समर्थानी लिहिलेलं काव्य.रामाच आगमन समर्थांना किती मुग्ध करत होत,याचा प्रत्यय आपल्याला या ओवीत दिसतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तुझे मारुतीसारिखे दास देवा..|*
*मज मानवा किंकरा कोण कोण केवा..|*
*दिनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे.|*
*तेणे मानसी थोर आनंद माजे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. वायुसुत हनुमंतासारखा अग्रगण्य असा सेवकराज तुझ्या दास्यत्वाचे गुण गातो..तुझे समूळ दास्यत्व स्वीकारून मनोभावे तुझ्या चरणाशी लिन होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. हनुमंतासारखा तुझा दास असताना माझ्या सारख्या मानवाची,दासाची तुलना मी त्या भक्तश्रेष्ठाशी करून काही चुकीचे करत नाहीये ना..?

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. हे धाडस मी करतोय कारण तू जसा अशा भक्तश्रेष्ठाचा आश्रयदाता आहेस तसाच माझ्या सारख्या शूद्र उपासकाचा ही तू प्रेमळ दृष्टीने उद्धार करतोस अशी तुझी कीर्ती आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..अशा भक्तीमुळ खात्रीने,केवळ तू माझा पाठीराखा आहेस,माझ्या साठी कनवाळू आहेस या कृतार्थ जाणिवेने माझं मन आनंदाने,साफल्याने भरून आलं आहे.

समर्थ हनुमंताच्या भक्तीचा  आणि श्रीरामांच्या सख्यत्वाचा दाखला देऊन स्वतःला त्याठिकाणी पाहतात.आणि रामाच  सर्वकारुण्य ब्रिद ओळखून स्वतः ही मनाशी संतुष्ट होतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुनायका नीकट दास तुझा..|*
*तुला विकिलासे स्वयें देह माझा..|*
*सदा सर्वभावें करी दास्य तुझे..|*
*देई आपुले वेसवेतेन माझे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मी तुझा अतिशय शीघ्र आणि जवळचा दास आहे.मला तुझी हरप्रकारे सेवा करायची असल्यामुळे तुझ्या प्रत्येक,नवविधाभक्तीमध्ये मला स्वतः सादर व्हायचं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..हा माझा देह तुझ्या भक्तीच्या,आशिर्वादाच्या बदल्यात पूर्णपणे तुझा झालाय.मी त्याचे कोणतेही ऐहिक मूल्य आता ठेवलेले नाही.राखलेले नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मी हरप्रकारे तुझी सेवा,उपासना करतोय. तू दाखवलेल्या मार्गावरून चालतोय.तुझा आदर्श घेऊन माझं आयुष्य व्यतीत करतोय.तन,मन,धनाने केवळ तुझं दास्यत्व मी स्वीकारलेलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..आता मला माझ्या या दास्यत्वाचा मोबदला दे.आणि तो मोबदला म्हणजे तुझ्याशी अक्षय एकरूपता..!तुझ्या अखंड उपासनेचे कर्तृत्व..!तुझे आजीवन दास्यत्व..!

समर्थ उपासनेच अंतिम फलित कायमच रामचरण अपेक्षित करतात.आणि त्यासाठी रामाकडे स्वतः  स्वीकारलेल्या सर्वस्व त्याग आणि सदेह दास्यत्वाची आठवण ही करून देतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तुझा भृत्य मी भार्गवादर्पजीता..|*
*जीवित्व असे अर्पिले तुज आता..|*
*भवा जिंकिता जीव देईन पाहे..|*
*तुज सन्मुख पाठिसी स्थिर राहे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..तुला शरण येऊन मी तुझा दास झालोय.तू परशुरामासारख्या महावीराला त्याच गर्वहरण करून त्याला भक्त केलेस.तसच माझेही स्वतःबद्दलचे अनेक गैरसमज तू मोडून काढून मी तुझ्या दास्यतेचा बहुमान मिळवला आहे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..अशी संपुर्ण शरणागती मी घेऊन तुझा कायमचा दास झालोय.माझं जीवपण तुझ्या चरणाशी अर्पण केल आहे.सर्वस्व अर्पण केल आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. माझं भवभय मी तुझ्या भक्तीने विसरून जातो.ते इतकं नगण्य वाटत की आयुष्यात तुझ्या  संकीर्तनच्या बदल्यात जीवित्व सोडून द्याव अस वाटत.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..जेंव्हा असा तुझ्या सन्मुख मी दास म्हणून उभा  रहातो तेंव्हा एक चमत्कार घडतो.माझ्या सन्मुख असताना माझ्या पाठीशी  एका विशाल आशीर्वादीत देवते सारखा उभा रहातोस.आणि मी निश्चिन्त होऊन जातो..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२