*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*सकलगुणनिधीचा राम लावण्यसिंधु..|*
*अगणित गणवेना शक्तिरूपे अगाधु..|*
*प्रबळ बळ चळेना वाउगे व्यर्थ कामी..|*
*म्हणवूनी मन रामी लागले पूर्णकामी..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
हा राम सर्वगुणसंपन्न असा एक पुरुषोत्तम आहे.याचे मनाचे सौंदर्य,याचे घननिळ असे शरीरशौष्ठव,त्याची अलौकीक अशी कारुण्यशक्ती आणि मनमोहक असे अजोड असे मनोहर दर्शन हे सारे केवळ मनभावन आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
या रामाचे अनेक गुण,अनेक शक्ती अशा आहेत की ज्याची मोजणी ही करता येत नाही इतका तो अगाध आणि असीम आहे.किंबहुना हा राम ह्या अनेक शक्ती,माया यांचच एक सगुण रूप आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
हा राम सान्निध्यात असताना इतर कोणत्याही प्रबळ शक्ती,मोह,माया आपल्याजवळ येत नाहीत. परमार्थाशिवाय व्यर्थ अशा कोणत्याही कामात मन जात नाही.
समर्थ रामदास म्हणतात..
या साऱ्याचा सुंदर असा परिणाम असा झाला आहे की हे मन रामाच्या संकीर्तनात पूर्णपणे गढून गेले आहे.इतर कोणत्याही व्यवधानात आता रमेल अस वाटत नाही.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२