समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*ममवदनसरोजी षटपदे शारदांबे..|*
*रघुपतिगुण रुंझे तू न गुंते विलंबे..|*
*तववरि करि लाहो प्राण जै अर्क आहे..|*
*प्रचळीत समयी आकर्षणे स्थिर राहे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

माझ्या मुखकमलावर एखाद्या मधाच्या थेंबासारख्या असणाऱ्या रामनामाचा सरस्वतीमाते,तुझ्यामुळे माझ्या वाणीमध्ये  भुंग्यासारखा वावर आहे..!

समर्थ रामदास म्हणतात..

हे सरस्वतीमाते,माझ्या मुखात तू रामाच्या अपरंपार गुणांच्या संकीर्तनाच अखंड गुंजारव करुन दे.त्यासाठी मात्र तू शीघ्र कृपा कर इतर कुठेही गुंतू नकोस.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सरस्वतीमाते,हे रामनामाच गुंजारव म्हणजे श्वासातील सोहमतत्वाच अस्तित्व हे जोपर्यँत या प्राणात,शरीरात  आत्माराम,पंचप्राणरुपात  आहे तोपर्यंत अबाधित असू दे..!

समर्थ रामदास म्हणतात..

हे रामनाम सध्या आणि कायमच कोणत्याही विषमकाळी माझ्या आयुष्यात,मनात चालू राहू दे.त्याबद्दलच मला असणार प्रेमाचं आकर्षण ते ही कायम जागत असू दे..!ही कृपा कर सरस्वतीमाते..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*वरुण वदन वापीमाजि जिंव्हास्वरूपी..|*
*मुख वसत तदापी वैखरी कोकीळापी..|*
*मधुर मधुर कुंजे नाम या राघवाचे..|*
*निववी वसत संती श्रोत्रयां सज्जनांचे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या जिभेच स्वरूप एखाद्या संतत धार असलेल्या पावसाच्या सरीसारखं सारख झालं आहे.तिच्यायोगी ही रामनामरूपी संतत धार एका पवित्र डोहासारखी माझ्यात साठू लागली आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे नाम माझ्या मुखातून येत खर पण ते इतकं माझं मलाच मधुर वाटत की एखाद्या कोकीळेने अतिशय सुस्वराने आलाप घ्यावा.आणि त्या बंदीशीची लयलूट या साऱ्या आसमंताने करावी.

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्यात आणि माझ्याभोवती हे रामनाम निसर्गातून,अंतर्मनातून सदोदित इतकं ध्वनित होत त्यामुळे माझा देह,मन एक रामनामाचा गाभारा होऊन जाते.

समर्थ रामदास म्हणतात..

हे रामनाम प्रत्येकाचे मन,हृदय,शरीर निशांत करत जाते.जो कोणी संत या रामनामाचे संकीर्तन करतो,जो कोणी श्रोतृवृंद त्याचे श्रवण करतो,जो सज्जन या रामनामाचे मनन करतो हे सारे या नामसंकीर्तनाने स्वतः कृतार्थ होऊन जातात. मुक्त होऊन जातात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सकळ भुवन तारी राम लीळावतारी..|*
*भवभय अपहारी राम कोदंडधारी..|*
*मनन करि मना रे धीर हे वासना रे..|*
*रघुविरभजनाची हे धरी कामना रे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

साऱ्या त्रिभुवनाला तारून त्याच कल्याण करणाऱ्या रामाने त्याच हे कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक अवतार घेतले,ते घेऊन अनेक कृपापर लीळा या रामप्रभुने केल्या आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

मनात विकल्प करणाऱ्या भवाच्या लाटा आणि भयाच्या आशंका यांचा परिहार हा राम कृपारूपी कोदंडाने करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रामरायाचे चिंतन हेच खरे मनाचे इप्सित आणि कर्तव्य आहे.आपल्या मनाने हे आपलेसे केले पाहिजे.त्यामुळे मनात धीर पणे वासनांचा उदय होण्याआधी त्यांचं निरसन होईल.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्यातून आयुष्य कृतार्थ होण्यासाठी रघुनाथाची उपासना हा एकच छंद असला पाहिजे जो जीवनाचा अंतिम ध्यास असला पाहिजे.म्हणून हे मना तू रामोपासनेच लक्ष्य समोर ठेव.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुवरपर आता किर्तनी गुण गावे..|*
*मथन त्रिभुवनाचे सर्व साहित्य फावे..|*
*सकळ जन तरावे वंश ही उद्धरावे..|*
*स्वजन जन करावे रामरूपी भरावे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रघुनाथाचे गुणवर्णन हे त्याच्या उपासनेत नेहमी आठवावे,त्याचा नेहमी आदर्श घ्यावा.हे आपल्या मनाला,आयुष्याला पूरक असते.

समर्थ रामदास म्हणतात..

त्रिभुवनाच्या साऱ्या या अस्तित्वात त्याचे अस्तित्व,त्याने निर्माण केलेले जीव शिव याचे  वैचारिक मंथन करत तो किती अपरिमित आहे याचा विचार करावा.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा साऱ्या उपासनेने,रामवृत्तीने स्वतःची,आयुष्याची उत्तम उन्मन अवस्था आणून आपण कृतार्थ होऊया.या रामकृपेने पूर्ण वंश उध्दरून तो उत्तम प्रकारे कार्यफलीत होऊ शकतो.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा साऱ्या रामदासी समाजाने समूहाने एकत्रित येऊन उदंड संकीर्तन करावे. असा रामउपासनेचा स्वाहाकार आपले परके असे सारे एकत्र येऊन केवळ राममय सृष्टी निर्माण करावी अशी मनाची आर्तता आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुपती गुणरंगे पाविजे भक्तीसंगे..|*
*भजन जनतरंगे सर्व सांडून मागे..|*
*अनुदिन वितरागे योगयागं विरागे..|*
*प्रकट तरत संगे सर्वदासानुरागे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझा रामराय मला कसा पाहिजे तर तो सर्व गुणाने युक्त,सर्व दृष्टीने पूर्ण,सर्व वृत्तीने विदेह..!आणि हा परिपूर्ण असा हा रामराजाच्या भक्तीरंगात रंगलेला राम निकट असू दे..!

समर्थ रामदास म्हणतात..

तो स्वतः संकीर्तनात स्वतःला हरवून घेतोच पण त्याबरोबर भक्तगणांना ही तो त्यांचे तापत्रयी विसरून,मागे टाकून परमार्थाच्या सुरेख वाटेवर आणून ठेवतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या संकीर्तनाने,उपासनेने मी आसक्तीविरहित होत चाललो आहे.योग,तपस्या,अनुष्ठानाने मनातील सर्व प्रकारची आसक्ती नष्ट होउन मन विदेही होत चालल आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्या संकीर्तनाच्या सोहळ्यामध्ये हा राम ही रंगून जातो..!आमच्या सारख्या दासांच्या या सोहळ्यात एक दैवत म्हणून तो असतोच पण आमच्यातला भक्त होऊन ही आमच्यात तल्लीन होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांची साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*मधुकर मन माझे रामपादांबुजी हो..|*
*सगुण गुण निजांगे नित्य रंगोनि राहो..|*
*अचपळ गुणगुणी बैसली प्रीति दुणी..|*
*शरणचरणभावे जाहला राम ऋणी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझे मन हे रामाच्या चरणापाशी अतिशय आनंदी मानसिक अवस्थेत गढून आहे.हे गढून जाण हे सर्वोच्च अस सुख आहे हे ही मनाला प्रतीत होत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे कायम रामपादुकांशी रंगून गेलेलं मन कायम असेच निजानंदाचा सोहळ्यात रंगून राहो.आणि तो सोहळा आजन्म माझ्याभोवती साजरा होत राहो.

समर्थ रामदास म्हणतात..

कायम रामगुणांच संकीर्तन,मनन याने रामाबद्दलची आत्मीयता अजून वाढू लागली आहे.आणि त्याच संकीर्तनाच कायम मनन करण्यात मन धन्यता मानू लागलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या रामाच्या शरण्यभावाने जसा प्रत्येक पूजनीय त्याची पूजा करणाऱ्याच्या भक्तीत ऋणी असतो.तो त्याच्या भक्तीत, संकीर्तनात तल्लीन असतो तसा राम ही माझ्या या भक्तीत माझा ऋणसखा झाल्याचा भास होतो आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*परमसुखनदीचा मानसी पूर लोटे..|*
*घननिळतनु जेंव्हा अंतरी राम भेटे..|*
*सुख परमसुखाचे सर्व लावण्य साचे..|*
*स्वरूप जगदिशाचे ध्यान त्या ईश्वराचे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

सुखाची एक तरल लाट असते.जी मन समृद्ध करते.जी शरीर,अंतःकरण शुद्ध करते.जी एक निरामय वृत्ती तयार करते.आनंद निर्माण करते.

समर्थ रामदास म्हणतात..

ती लाट,तो ओघ म्हणजे घननिळ वर्णी शरीराराच्या  रामप्रभुचे चिंतनात सगुण रूपाने येणे.राम सगुण रुपात मी करत असलेल्या संकीर्तनात येतो आणि निर्गुणरूपात मला दर्शनाची आवड निर्माण करून देतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या श्रीरामाच्या अस्तित्वाचे,त्याच्या गुणांच्या स्तुतीचे,त्याच्या पराक्रमाच्या आरतीचे आंतरिक सुख मनामध्ये,विचारांमध्ये उचळंबुन येते.

समर्थ रामदास म्हणतात..

तेच रामाचे दर्शन हे त्या सर्वव्यापी जगदीश्वराचे रूप आहे.सर्व ब्रह्मांडाला व्यापून उरलेल्या निराकार,निरामय परमेश्वराचा तो सगुण असा वावर आहे.त्या परमेश्वराचे ध्यान,स्वरूप म्हणजे हा घननिळ रामच आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२