*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*तरुणपण देहाचे लोपता वेळ नाही.|*
*तनमनधन अंती वोसरे सर्व काही.|*
*सकळ जन बुडाले व्यर्थ मायाप्रवाही..|*
*झडकरी सुमना रे हित शोधूनी पाही.||*
समर्थ म्हणतात..
देहाला तारूण्य मिळणं हा निसर्गक्रम आहे.ती दैव देणगी आहे.या काळात सौष्ठव मिळत.गात्र शाक्त होतात.विषयसुख ज्ञान होत.पण आयुष्याची कालगणना केली तर खुपच हे सारं थोड्या काळासाठी असत.
समर्थ म्हणतात...
शरीराचे सौष्ठव व आकृतिबंध,मनाचा विषयसुखाकडे ओघ,ऐश्वर्य संघटित करायचं कसब आणि उचित काळ हे हळूहळू उभारीला येत जरूर पण संपत जात.उतरत जात.
समर्थ म्हणतात..
सामान्य जन जे या साऱ्या गोष्टींना चिटकून असतात,ते सदोदित या साऱ्या मागे धावत असतात.हे सारे टिकवायचा निरार्थक प्रयत्न करत असतात.आणि हे करता करता स्वतःला निरिच्छ करण्याच्या ऐवजी लिप्त होत आकंठ बुडून जातात..!
समर्थ म्हणतात..
अशा वेळी आपलं मन आहे जे मूलतः सद्गुणी आहे.ईश्वरसंगाच माध्यम आहे.त्याला स्मरून,त्याच मूळ हीत जाणून यथावकाश आपण त्याला कायमच सुखांकीत करण,करायला लावणं हे आपलं कर्तव्य आहे.
समर्थ मनुष्यजन्मातील सुखाच्या काळाच मूल्यमापन करून त्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देतात.आणि हितकारी अशा मनाचा मागोवा घेत सत्यसुख शोधायची अपेक्षा करतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२