समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*श्रीराम भक्तमूळ रे|*
*प्रसन्न  सानुकूळ रे |*
*समर्थ तो तयागुणे |*
*समस्त होय ठेंगणे |*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

प्रत्येक भक्ताचे मूळ त्याची सुरुवात,त्या भक्तांचा उगम हा राम आहे आणि या भक्तांच मुख्य उद्दिष्ट,कायमचा अंतिम ध्यास हा रामच आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रामराया अतिशय सुमुख असा आहे.तो दर्शनाने आनंददाता,त्याच अनुकरण हे आनंदमार्ग,त्याची प्राप्ती ही कायममुक्ती आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामरायांची अनुकूलता,त्याच प्रत्येक प्रसंगी आपल्याबरोबर असणं..प्रत्येक अवस्थेत राम बघणं या मुळे भक्त हा स्वतः ऐहिक तापत्रयीतून मुक्त होऊन स्वतः समर्थ होतो.त्या अर्थाने कृतार्थ होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

रामरायांची भक्ती करून हा सामान्य भक्त अशा उंचीवर पोहचतो की जेथे सर्व सुखे अतिशय खुजी वाटतात.रामाचा संग, रामरंग हा त्याला सर्वोच्च सुख प्रदान करतो.आणि तो अच्युत,अढळ अशा मुक्तीपर्यंत पोहचतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment