समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*प्रपंच संचिता हरी.|*
*विसंचिता बरोबरी.|*
*दयाळ तो परोपरी.|*
*विशाळ सेवका करी.|*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

साठलेली प्रपंचातील तापत्रयी,उद्वेग,दुश्चित्तपणा हे सगळं हा रामराया त्याची उपासना करू लागलो की आपल्याकडून त्याग करून घेतो.हे सगळं आपल्यापासून दूर घेऊन जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या सगळ्या प्रापंचिक,शारीरिक उपाध्या दूर झाल्या की तो रामराया आणि आपण यात अंतर काहीच रहात नाही.तो आणि आपण त्याच्या उपासनेच्या साह्याने एकरूप होउ लागतो.बरोबरीचे होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

तू रघुराज इतका दयाद्र होतो.क्षणाक्षणाला कृपा करतो की प्रत्येक वेळी आयुष्यातला प्रत्येक क्षण म्हणजे त्याच प्रेमाच देणं होऊन जातं.

समर्थ रामदास म्हणतात..

ही कृपा करता करता रघुराज इतक देतो त्याची उपासना करणारा भक्त हा दिवसेंदिवस उदात्त,अपरिमित,अमूल्य होत जातो.तो एक भक्तीपूर्ण  विश्व होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment