*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*नवस हरिकथेचे राम भक्ती करावे..|*
*कठिण विषम काळी मम जीवी धरावे..|*
*विविध सकळ काही दोष नासुन जाती..|*
*रघुविरभजने हो कामना पूर्ण होती..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रामभक्तीने भारून गेलेल्या आयुष्यात कामना,इच्छा फक्त हरिकथेची, रामसंकीर्तनाची करावी..!त्यासाठीचे नवस हे भक्ती सुदृढ होण्यासाठी रामरायांच्या चरणी सदोदित करावे.
समर्थ रामदास म्हणतात..
माझ्या आयुष्यातील अनेक विषम काळ,दुःखाने हरवून गेलेले काही प्रसंग,काही विरुद्ध असे घटनाक्रम अशा काळी रामराया तू मला तुझ्या हृदयापाशी धरून ठेव.
समर्थ रामदास म्हणतात..
माझ्या हातून होत असलेल्या या तुझ्या संकीर्तनाने माझ्या मनात साठलेले सारे दोष,किल्मिष निरसन होऊन मन अगदी शुद्ध होऊन जाईल.
समर्थ रामदास म्हणतात..
अशा भक्तीपंथात,परमार्थात एकच इच्छा राहते ती म्हणजे रघुवीर दर्शनाची,मुक्तीची ती ही या संकीर्तनाच्या आवडीने, व्रताने पूर्ण होऊन आयुष्य कृतार्थ होते.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment