समर्थांची करुणाष्टके (२)
कडवे पहिले...
समर्थ म्हणतात...
असंख्यात रे भक्त होऊनी गेले...
तिहीं साधनांचे बहु कष्ट केले..
नव्हे कार्यकर्ता भूमीभार झालो..
तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो...!
रामराया...मारुतीरायापासून तुझ्या भक्तांची शृंखला ही अतुलनीय आहे..!तुझे असंख्य भक्त,तुझे असंख्य प्रशंसक,तुझ्या चरणी लिन झालेले लक्षावधी संत,साधू असे कितीतरी..!
हे सगळे कितीतरी संख्येने आहेत..!त्यांची तुझ्याप्रती असलेली निष्ठा याला कोणतीही मर्यादा नाही..!
या सगळ्यांच्या,भक्तश्रेष्ठ महाजनांच्या रांगेत माझं स्थान खूपच मागे आहे..!
रामराया...या सगळ्या नरश्रेष्ठांनी तन, मन,धनाने तुझी अपार सेवा,भक्ती केलेली आहे..त्या भक्तीचे अतिशय नेत्रदीपक मानदंड त्यांनी माझ्यासमोर घालून दिलेले आहेत..!
आपण आहोत त्या शाररिक,मानसिक,आर्थिक अवस्थेत तुझी भक्ती अबाध्य कशी ठेवायची ह्याचे ही आदर्श त्यांनी घालून दिले आहेत..!
पण रामराया..या सगळ्यांच्या तुलनेत माझी भक्ती,माझें आर्जव, माझे तुझ्याबद्दलचे ज्ञान खूपच तोकडे वाटायला लागले आहेत..!
रामा..अश्या साऱ्या तुझ्यापर्यंत पोहचण्यासाठी चाललेली माझी धडपड ही केवळ धडपड रहातीये..!तुझ्यासाठी मला भक्त म्हणून,सेवेकरी म्हणून जे कार्य करायचे ते अपूर ठरतंय..!मी स्वतः माझं हे शरीराच ओझं या भूमीवर निर्हेतुक घेऊन फिरतोय अस मला वाटायला लागलं आहे..!माझा हा कर्तव्यहीन देह या भूमीभार आल्याची लाज मला वाटायला लागली आहे..!
रामा...हे सगळं असलं तरी तुझा दास मी आहे अस मी मानतोय..!तुझा दास असुन मनासारखी आणि तू प्रसन्न होण्याइतपत सेवा करता येत नाहीये म्हणून माझा जन्म मलाच लाजिरवाणा वाटतोय..!
समर्थ किती समर्थपणे आपली पार्श्वभूमी भक्त म्हणून व्यक्त करतायत..?
हे ही करणं आपल्याला जमत नाही..!
कारण राम आणि आपल्यामध्ये आपला देह येतो..!
त्या देहाचं असणं हे त्या रामपर्यंत जायचं एक माध्यम आहे तेच या साधनेत शाप ठरत आहे..!
हा देह भक्तीविना,उपासनेविना भूमीभार ठरतोय अस प्रांजळ मत समर्थ इथे व्यक्त करतायत..!
अस प्रांजळ आपल्याला आपल्या मनाशी होता येईल..?
यायलाच पाहिजे..!
श्रीराम...
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment