समर्थांच करुणाष्टक (२)
कडवे सहावे..
समर्थ म्हणतात...
कितेकी देह त्यागिले तूजलागी..
पुढे जाहले संगतिचे विभागी..
देहेदुःख होताच वेगे पळालो..
तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो...!
रामराया...
तुझ्या साठी तपसाधना करता करता कित्येकांनी स्वतःचे देह झिजवलेत..घोर तपस्या करता करता अनेकांनी मृत्यपर्यंत तुझी अपरंपार प्रार्थना केली आहे..अनेक कठीण अनुष्ठाने,उपवास करून स्वतःच्या देहभावना विसरण्याची पराकाष्ठा करत ते तुझ्या धामी पोहचले आहेत..!
रामराया, हे सगळं करूनच अनेक जण तुझ्या सस्वरूपाचे सांगाती झालेले आहे..रामरंगी रंगून जीवन सार्थकी लावून गेले आहेत..!
रामराया,या सगळ्याचा मी ही प्रयत्न करतोय..पण मनाचे विकार,देहबुद्धी लगेच डोकं वर काढतीये..!भूक,तहान, वेदना,सहनशक्ती ह्या साऱ्या गोष्टी मला माझी साधना गिळंकृत करायला येतात..!
माझी साधना ही दुय्यम ठरुन माझी देहबुद्धीच माझं शरीर अनुसरू लागत..!आणि मग ती देहबुद्धी मला तुझ्या साधनेपासून,भक्तीपासून दूर घेऊन जाऊ लागते..!
रामराया...याच देहबुद्धीचं ओझं माझ्या आयुष्यावर,जिवीत्वावर पडू लागलय...तुझी भक्ती,तुझी ओढ ही मागे पडत चाललीये..आणी या देहबुद्धी सहित माझं अस्तित्व उगीच जन्माला आल,अकारण जन्माला आल अस वाटू लागलं आहे..!
रामराया..या देहबुद्धीचं विस्मरण होऊन तुझ्या चिरंतन अस्तित्वाच चिरकालीन सुख माझ्या ठायी येऊ दे..!
श्रीराम..!!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment