समर्थांची करुणाष्टके (३)
कडवे दुसरे...
समर्थ म्हणतात...
रघुनायक जन्मजन्मांतरीचा..
अहंभाव छेदूनि टाकी दिनाचा...
जनी बोलती दास या राघवाचा...
परी अंतरी लेश नाही तयाचा...!
रामराया...मी किंव्हा आम्ही सगळेच जन्माला येतो तेंव्हा सोहम वृत्ती सोडून कोहम वृत्ती धारण करतो..!कोहम म्हणजे मी आणि माझा मी..!मनुष्यजन्माला आलो तेंव्हाच हा मनुष्यपणाचा अहंकार माझ्या मनाला चिकटला..!
रामराया..हा अहंभाव,ही मनुष्यपणाची बेदरकार वृत्ती हीच माझ्या भक्तीच्या मुळाशी आलेली आहे..!रामा तूच आता माझ्या मनातल्या अहंभाव समूळ नष्ट करून आत्मारामापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवशील का रे..?
रामा..मी जगताना तुझे नाम घेतो,तुझ्या ध्यानात असतो,तुझ्या सेवेत असतो..हे सगळं बघून माझ्या भोवतीचे माझे सगेसोयरे मला तुझा म्हणायला लागले आहेत..!मी तुझ्यात रमलोय अस म्हणायला लागले आहेत..माझी ओळख तुझे समचरण असे समजायला लागले आहेत..!
रामराया..हे सगळं असलं तरी तुझे मूळ स्वरूप आहे..सगुणाच्या पलीकडचं जे निर्गुण निराकार रूप आहे त्याच अस्तित्व अजूनही मला कळत नाहीये..!
रामकृपा ही रामदासाच्या बाह्य वागणुकीवर नाही तर भक्ताच्या आत राम किती पोहोचलाय..त्याच्यातला आत्माराम किती प्रकट झालाय..?यावर अवलंबून असते.आणि ती अवस्था येण्यासाठीची समर्थांची तळमळ आपल्याला इथे दिसून येते..!
हा आत्मस्वरूप राम आपल्या सर्वांच्या ठायी प्रकट होवो ही समर्थचरणी प्रार्थना..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment