*समर्थांचे साहित्यविश्व..*
*भुपाळी*
*भाग ४*
*राम योगीयांचे मंडन..*
*राम भक्तांचे भूषण..*
*राम आनंदाचा धन..*
*करी रक्षण दासांचे..!*
समर्थ म्हणतात..
हा रघुराज आहे ना?तो तापसांचे तप,योगीयांचा योग,संन्याशाचे संन्यसत्व आहे.तो रघुराज त्यांचं सकल साध्य आहे.आणि साधन ही.
समर्थ म्हणतात..
हा रघुराज भक्तांसाठी आनंदाच कारण आहे.आरतीतल वर्णन,अभिषेकातल सुक्त आहे.हा राम भक्तांसाठी एक विश्रामयुक्त धाम आहे.
समर्थ म्हणतात..
रघुराज एक आनंदाच अस्तित्व आहे.थिजलेल्या पण तृषार्त अशा भक्तांच्या मनासाठी, समूहासाठी राम हा सअमृत असा नभ आहे जो भक्तांमध्ये चैतन्य निर्माण करतो.
समर्थ म्हणतात..
रघुराज हा भक्तपालक ही आहे.जो संसारात भक्तांच तापत्रयी पासून आणि परमार्थात षड्रिपुपासून रक्षण करतो.असा रघुराज हा कोणाच आराध्य नसेल बरे..?सगळ्यांच्या ठायी आणि सर्वांच्या भोवती तोच आहे..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment