*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ६*
*भाग २*
*तुज समुदाय दासांचा..*
*परी आम्हा स्वामी कैचा.|*
*तुजसाठी जिवलगांचा.*
*संग सोडीला..||३||*
*सगुण रघुनाथ मुद्दल.*
*माझे हेचि भांडवल..|*
*दास धरून पैलपार..*
*टाकी या भवाचे..||४||*
समर्थ म्हणतात...
रघुराजा..तुझ्याभोवती नेहमीच तुझ्या भक्तांचा मेळा असतो.तुझं संकीर्तन, तुझं पूजन या योगी तुझ्याभोवती कायम योगी,तापस,भक्त यांचा वावर असतो.आणि असणारच..!
हे जरी सत्य आहे तरी मीही तू माझा स्वामी आहेस याच निष्ठेने तुझ्या दारी आलो आहे.तुझ्याशी अनुसंधान जोडून आहे.
समर्थ म्हणतात...
रघुराजा..आम्ही तुझ्या भक्तीच्या आधारे आमचे सगेसोयरे बाजूला ठेवून तुझ्या पदकमलाच्या सान्निध्यात आलो आहोत.आणि आता निग्रहाने तिथेच आयुष्य वाहून आहोत.
समर्थ म्हणतात...
रघुराजा..कारुण्यसिंधु असा तू राम हीच आमची आता मिळकत,तुझं नाम हेच चलन आणि तुझा आशीर्वाद हीच उपजीविका आहे.तुझी जी वेगवेगळी नामाभिधाने आहेत तीच आमची आता बलस्थाने आहेत.
समर्थ म्हणतात...
रघुराजा..हेच आमचे दास्यत्व आता मान्य कर.आमचा समूळ स्वामी होऊन आमच्या सुकृतातल जे वैगुण्य आहे ते मिटवून घे.आणि आमची की आयुष्याची वाटचाल या भवसागरातून काढून परमार्थाच्या विहंगम अशा तीर्थक्षेत्री आणून आमच्या आयुष्याचा उद्धार कर.
समर्थांनी रामरायाला सर्वस्व केलं आहे.जगवता,राखता राम तसाच सांप्रत व्यवहार ही राम च आहे.आणि हा व्यवहार पाळून ते परमार्थात मुक्तीचा फायदा करून देण्याची रामरायाकडे प्रार्थना करत आहेत.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment