*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*तुजवीण सीण झाला धाव रे रामराया.|*
*कठीण दिवस जातो तापली सर्व काया.|*
*सकळ विकळ गात्रे अवस्था लागली रे..|*
*तुजवीण जगदीशा बुद्धि हे भंगली रे..||*
समर्थ म्हणतात..
रामराया..तू तर विश्रामधाम आहेस..!तू तापत्रयाने पोळलेल्या प्रत्येकासाठी सावलीच प्रेमळ रूप आहेस.तू जोपर्यंत नाहीस तोपर्यंत मन,बुद्धि आणि त्यामुळे शरीर हे कष्टी होत आहे..!
समर्थ म्हणतात..
रामराया..व्यवहार म्हणून दिवसभर मला प्रपंचासाठी अतीव धावाधाव करावी लागते.आणि जोडीला परमार्थ नसल्यामुळे आणि तुझं दुरत्व आसल्यामुळे माझे अस्तित्व अतिशय तप्त,क्षुब्ध असे वाळवंट झाले आहे.
समर्थ म्हणतात..
रामराया..पंचेंद्रियांच्या सुखाचे डोहाळे हे माझा पिच्छा सोडत नाहीयेत.त्यामुळे जी गात्र तुझ्या संकीर्तनाने,अस्तित्वाने सुखकारक होणे हे छान असते.ती गात्रे या प्रपंच ओढाताणीमुळे गलीतगात्र होत चालली आहेत.
समर्थ म्हणतात..
रामराया..जगन्नायका तू असलास की बुद्धि,मन हे स्थिर असते.तुझ्या कृपेमुळे,उपासनेमुळे सुखकारक असे जीवन मार्गदर्शन होते.तू नसलास की मनाची अवस्था द्विधा होऊन विकल्प मनात उभे रहातात.तुझ्याविना जगणं हे सुसह्य होत नाही रे..!
समर्थ रामरायासाठी व्याकुळ असताना मन,शरीराची विकल्पि अवस्था वर्णन करतात.आणि तो विकल्प नष्ट होण्यासाठी जीवनात *राम* येणं महत्वाचं आहे हे ही समजावतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment