*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*रघुनाथपदयुग्मि लिन भावे असावे..|*
*रविकुळटिळकाचे नाम वाचे वसावे.|*
*श्रवणमनन भावे आदरेसी करावे..|*
*परम सुख समाधी संतसंगे तरावे.||*
समर्थ म्हणतात..
श्रीरामाचे चरण हे निशांत मुक्तीस्थळ.दोन चरणांचा हा दृढ ठेवा.ह्याच्याशी सदा नम्रतेने पूजनांकित असावे.इथे सर्व आशा अर्पण करून केवळ रामकृपेचा ध्यास असावा.
समर्थ म्हणतात..
या सूर्यवंशी भूषण अशा रामरायाचे नामजप,नामसंकीर्तन हे प्रत्येकाने आपल्या वाचामुखी सर्वकाळ बोलावे.त्याचे वास्तव्य कायमच आपल्या पंचेंद्रियांत असावे.
समर्थ म्हणतात..
या रघुराजांचे चरित्र हे पर्वणी आहे.तो एक आनंदअनुभव आहे.तृप्त करणारी एक संजीवनी आहे.त्याचे श्रवण मनन हे एक आदरयुक्त असे यजन आहे.जे भावभक्ती ने प्रत्येकाने करावे.
समर्थ म्हणतात..
या साऱ्या संकीर्तन,मनन,जपध्यानाने निःसंग समाधी आपोआपच प्राप्त होते.जी सुखांत निर्माण करणारी असते.याबरोबरच संतसंगतीने त्या समाधीमध्ये अमूर्त पण पूर्ण चैतन्यमयी अशा व्यक्ततेची भर पडते.
समर्थांनी रामरायांची एक दृढ आणि स्वरूप,सुखदायी अशी प्रतिमा इथे वर्णन केली आहे.आणि त्या प्रतिमेच्या सगुण आणि निर्गुण दर्शनाने मिळणारी फलश्रुती सांगितलेली आहे.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment