*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-१*
🌹🌺
*विद्यानिधान गणराज विराजताहे..|*
*सिंधुर तो घवघवीत रसाळपाहे..|*
*विघ्नांसी मार अनिवारचि होत आहे..|*
*आनंदरूप तुळणा दुसरी न साहे..||*
🌹🌺
समर्थ रामदास म्हणतात..
माझ्यासमोर जो विराजमान झालेला प्रफुल्ल देव आहे तो गजानन जो सकल विद्यांची एक अनंत साठवण आहे.तो गणपती असा एकमेव अधिपती आहे जो प्रतिष्ठित झाला की भोवती श्रद्धा,विद्या,सुमती,ज्ञान ह्या सगळ्यांच वास्तव्य आधिष्ठान पावत.
समर्थ रामदास म्हणतात..
हा विद्याप्रधान गजानन... त्याच स्वरूप, सगुणरूप,मूर्तरूप हे लाल शेंदुराने लिप्त असे आहे.ह्या शेंदूरअर्चित गणेशाचे दर्शन हे तेजोमय रक्तरंगी जाणीवरूप आहे..!
समर्थ रामदास म्हणतात..
हा गणेश विघ्नहर्ता म्हणून प्रख्यात आहे.त्याच अस्तित्व,त्याच दर्शन,त्याच देवत्व इतकं प्रखर आहे की सर्व विघ्नरुपी दानवांच निर्दालन हा गणेश लीलया करतो.आणि त्याचा विघ्नावरती झालेला वार त्या संकटांना अनिवार,सहन न होईल असा असतो आणि भक्तांना आशिर्वादपूर्ण असतो.
समर्थ रामदास म्हणतात..
ह्या गणरायाचं स्वरूप हे उल्हासयुक्त आहे.प्रेरक आहे.हे मुखदर्शन सुखाची प्राप्ती आहे.ह्यातून प्रतीत होणार चैतन्य इतकं मोदप्रद आहे की त्याच धाम, त्याच सगुण रूप विराजित असलेलं स्थान सोडून कुठेही मन रमत नाही.आणि त्यासारखं इतकं सुखनंदन देवअस्तित्व दुसरं कुठे मिळत ही नाही..!
समर्थ रामदास गणपतीची करुणास्रोत्ररुपी पूजा करताना सुंदर,रसाळ वर्णन करतात.समर्थांच्या शब्दांनी प्रत्यक्ष ते सुंदर ध्यान आपल्यासमोर उभं रहात.आणि आपण त्याच दर्शन आपल्या स्वतःत साठवून ही घेऊ लागतो..!
जय गजानन..!
जय श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment