*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी..|*
*उदासीन जो वीतरागी विरागी..|*
*जनस्थानगोदातटी वास केला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट जाला..||*
समर्थ म्हणतात...
श्रीरामाच एक वेगळं स्वरूप.त्याच राजेश्री दर्शन,त्याचा एक भरजरी अवतार सोडून इथे तो त्यागी बनून राहिलाय.इथे तो वनवासी जीवन जगतोय.भाग्याला आलेलं वैभव मागे ठेवून हा रामराजा इथे उभा आहे..!
समर्थ म्हणतात...
रामराय..इथे जो आहे.तो रागलोभ मागे सोडून,राजयोग बाजूला ठेवून..!एक प्रकारचं प्रापंचिक वैराग्य लेवून हा राम एका तापस वेषात इथे उभा आहे..!
समर्थ म्हणतात...
हे स्थान पंचवटी.जे गोदावरीच्या निर्मळ तटावर वसलेलं आहे.जिथं रामप्रभु सपत्नीक वास करत आहेत.लक्ष्मणाच्या संगतीत.पंचवटीची भूमी या पदस्पर्शाने पावन झाली आहे.
समर्थ म्हणतात...
असा वैराग्यपूर्ण राम या डोळ्यासमोर उभा आहे.मी त्याच दर्शन घेऊन,दास्यभक्ती करून तृप्त आहे.तो रामराय जो माझ्या जपात,चिंतनात आहे तो साक्षात माझ्यासमोर सगुणरुपात उभा आहे.
समर्थ पंचवटी इथे गेल्यावर रामप्रभूंच्या समोर उभे राहिल्यावर त्याच वर्णन करतात.तो राम त्यांना कसा दिसला याचही वर्णन करून आपल्याला आलेला अनन्य अनुभव इथे कथन करतात..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment