*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-४*
🌹🌺
*वीतंडसा बलदंड गिरीतुल्य धावे..!*
*भक्तांसि रक्षित रिपूवरी तो उठावे..|*
*अंदुस तोडरगुणे करितो चपेटा..|*
*गर्जीन्नल्या घणघणाट प्रचंड घंटा..||*
🌹🌺
समर्थ रामदास म्हणतात..
अत्यंत विशाल रूप घेऊन हा गजानन पूर्ण ताकदीने पर्वतप्राय असा विश्वरूप अवतार घेऊन प्रकट होतो,धावून येतो..!
समर्थ रामदास म्हणतात..
असा गजानन विराट रुपात भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी सचेत असतो.त्याच हे भीमरूप हे विघ्नावर कर्दनकाळ बनून एक प्रहार होऊन त्यातून भक्त आणि सज्जनांच रक्षण करणार ठरत..!
समर्थ रामदास म्हणतात..
गजाननाचा हा आघात अतिशय न्यायप्रिय असतो.तो भक्ताला कळू न देता त्याच संरक्षण करतो.आणि त्याच्या विषम परिस्थितीवर नियंत्रण आणून भक्ताला सुखी करतो.
समर्थ रामदास म्हणतात...
या गजाननाच येणं हे इतकं प्रचंड अशा ध्वनांकीत अस्तित्वात येत की सहस्त्रावधी घंटानाद चालू आहे अस जाणवत.ह्या उदंड ध्वनीनेच विघ्न पळून जातात.
समर्थ गणपतीचे विराट,भव्य अस विश्वरूप इथं वर्णन करून सांगतात.भक्तांच्या विघ्नहरणासाठी त्याची भक्तवत्सल तत्परता किती भेदक आहे हे त्यांनी या ओवीत समजावून सांगितलं आहे.
जय गजानन..!
जय श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment