*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-५*
🌹🌺
*ध्यानी धरील नरकुंजर बुद्धिदाता..|*
*त्याची फिटे आवलीळा सकल चिंता..|*
*आधी गणेश सकळा पुजणेचि लागे..|*
*दासा मनी तजविजा आवजा न लागे..||*
समर्थ रामदास म्हणतात..
या गजाननाचे पद्मासन स्थितीतील ध्यान(नरकुंजरी अवस्था) खूपच मनभावन आहे..!तसच ध्यान जो धरेल त्याची साधना ही यथावकाश फलद्रुप होते.
समर्थ रामदास म्हणतात..
असे नरकुंजरी ध्यान मनात धरल्याने आयुष्यात उठलेले समस्त विकल्प,सगळ्या चिंता,सगळी संकटे निवारण होऊन तो भक्त सुखी होतो.
समर्थ रामदास म्हणतात..
या गजाननाचे पूजन,ध्यान सर्व भक्त,तापसी,साधू,संत यांनी करणे हे इष्ठच असते.हे सर्वप्रथम करण्याने त्यांचं इच्छित कार्य अतिशय सुलभतेने पूर्ण होते.
समर्थ रामदास म्हणतात..
हे गजाननाचे नरकुंजरी चिंतन प्रत्येक भक्ताला चिंता आणि भय यापासून मुक्त करते.आणि ह्या साऱ्या भावनांपासून त्याचे अस्तित्व कायमच अबाधित रहाते..!
समर्थ रामदास गणपतीचे नरकुंजरी रूप इथे प्रकट करतात.हे गणेशाचे ध्यान दुर्लभ पण मुक्तीदाते आहे.आणि त्याच्या उपासनेच फलित इथं सांगतात.
जय गजानन..!
जय श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment