*समर्थांचे साहित्यविश्व अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*लीळाविग्रही देव ब्रह्मदिकांचा.|*
*सदा बोलणे चालणे सत्य वाचा..|*
*जया चिंतिता चंद्रमौळी निवाला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला..||*
समर्थ रामदास म्हणतात..
रामप्रभु ही देवता स्वतःच्या सत्वगुणी लीळेमुळे पूर्ण देवाधिकांचे आराध्य बनली आहे.रामरायांचे सत्वच इतके तेजल आहे की त्याची उपासना ब्रह्मदिक देवतांनी केली आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
या रामरायाचे बोल मधुर तर आहेच पण याशिवाय त्याचे अस्तित्व सत्वगुणी असल्यामुळे,आणि त्याचे वचन ही अतिशय बहुश्रुत आणि समाजकल्याणीच असते.
समर्थ रामदास म्हणतात..
शिवशंकराने प्राशलेले हलाहल ज्याच्या केवळ नामोच्चरणाने शीतल झाले असा हा रामचंद्र शीतलतेचे प्रतीक आणि उगम ही आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
असा हा रामराय दर्शनाचे कृतार्थ असे फळ देतो ज्याने रामदास,भक्त संतुष्ट होतात..!आणि ते जन्माचे सार्थक करतात.
समर्थ रामदर्शनाचे फळ समजावून सांगतात.आणि त्या रामदर्शनाने त्यांना मिळालेल्या सकृत आणि अंतिम समाधानाचे ही वर्णन करतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment