*समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)
🌺
*दीनानाथ विख्यात हे नाम साजे..|*
*प्रजापाळकू रामराजा विराजे..|*
*बहु सुकृतीचा बरा काळ आला.|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला.||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
माझ्या रामराजाचे हृदय हे कोमल आणि दयावंत आहे.तो गरीब भक्तांसाठी त्राता आणि कृपावंत आहे.याची कीर्तीच मुलतः दीनानाथ या नावाने सर्वदूर पसरली आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
असा हा रामप्रभू सर्व सृष्टीचा आत्मा ही आहे आणि तो या समग्र सृष्टीचा पालक ही आहे.समस्त सजीवासाठी हा रामराया सर्वहीतदक्ष आणि पालक असा आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
रामरायांचे असे सुलक्षण दर्शन होणे हा योगायोग निश्चित नाही.किंव्हा ठरवून झाले आहे अस ही नाही.हे सगळं माझं शुचित पूर्वकर्माच फळ म्हणून मला मिळालं आहे.आणि त्यामुळेच मला हे सुखाचे दिवस दिसत आहेत.
समर्थ रामदास म्हणतात..
असा सुरंजनी रामप्रभू मला माझ्या नजरेने अनुभवता येतोय.मला माझ्या ज्ञानेइंद्रियात साठवता येतोय ह्याने मन अतिशय आनंदित होतय.
समर्थ या पंचवटीच्या काळाराम मंदिरात येऊन दर्शनाने भारावून गेलेले आहेत.आणि तो त्यांचा आनंद त्यांनी या ओवीतून व्यक्त केलेला आहे.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment