*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*लगा पाहता राघवेवीण नाही..|*
*निराधार हे पाहता सर्व काही..|*
*चळेना जनी तोचि आश्रो धरावा..|*
*रघुराज आधार त्याचा करावा..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रामरायाचा आश्वासक सहवास पाहता आधार ज्याला म्हणावा अस फक्त हाच असू शकतो.कारण हा रामराजा स्वतःचे अबाध्य ओज हे दासाच्या कल्याणासाठी सदा खर्च करत असतो.
समर्थ रामदास म्हणतात..
एकदा रामरायांच्या या आधाराचा,साथीचा अनुभव घेतला की कळत यांच्याशिवाय कोणताही आधार हा मनुष्याच आत्मिक,भावनिक कल्याण करू शकत नाही.
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया ज्या अचल,निग्रही स्वरूपात नेहमी दर्शन देतो तसाच त्याचा भक्ताच्या मागचा एक आधार ही असतो.असाच न ढळणारा आधार समस्त मनुष्याच्या मागे असला पाहीजे.
समर्थ रामदास म्हणतात..
म्हणूनच रामरायाच्या नामाचा,संकीर्तनाचा आणि त्याच्या आशीर्वाद,एकरूपतेचा आधार मला कायम मिळत रहावा आणि चिरंतन टिकावा ही प्रार्थना..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment