*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*लळे पाळीतो राम आम्हा दिनाचे..|*
*कृपासागरू भाव जाणे मनाचे..|*
*नुपेक्षी कदा संकटी घाव घाली..|*
*तया देखता मानसे ती निवाली..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
हा रघुराज जेंव्हा येतो तेंव्हा वात्सल्याने मातापित्या सारखे माझे निरागस हट्ट पुरवतो.प्रेमाने निरसन करतो.मी कितीही त्याच्याकडे मागितल तरी तो माझी आवड पूर्ण करतो.
समर्थ रामदास म्हणतात..
हा रघुराज कृपावंत इतका आहे की तो माझ्या मनात उठणारे प्रत्येक तरंग मनस्वी पणे जाणून घेतो आणि त्याची मला सुखकर अशी व्यवस्था करून देतो.
समर्थ रामदास म्हणतात..
हा रघुराज कुठल्याही अपेक्षेविना माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निरसन करतो.त्याचे सुखात परिवर्तन होईल अशी माझी जीवनशैली करून देतो.
समर्थ रामदास म्हणतात..
ह्या रघुराजाचे दर्शन घेतले की मनातले विकल्प शांत होतात.ईच्छा तृप्त होतात.मन सफल सम्पूर्ण अवस्था प्राप्त करते. एक तृप्त शांतता मन भरून पावते.
समर्थ चाफळला येऊन वसणाऱ्या रामरायाच गुणगान करताना त्याच्या अस्तित्वाचा त्यांच्यावर किती हळुवार पण सुखकर परिणाम होतो हे सांगत आहेत.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment