*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*रविकुळटिळकाचे रूपलावण्य पाहे..|*
*रविकुळटिळकाचे चिंतनी चित्त राहे..|*
*रविकुळटिळकाची कीर्ती जीवी भरावी..|*
*रविकुळटिळकाची मूर्ती ध्यानी धरावी..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रघुराज हा सूर्यवंशी आहे.त्याच तेज या वंशाला साजेसं दिगंत आहे.अपरंपार आहे.आणि ते तेज त्याच्या पुरुषी शौष्ठवात खुलून दिसत आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
ह्या सूर्यवंशी रघुराजाचे अनेक प्रकारच्या कथांमधले चरित्र,अनेक स्तोत्रामधील मंगल असे वर्णन आठवत आपले मन त्याच्या ठायी कायम सुपूर्द करावे. लिन व्हावे.
समर्थ रामदास म्हणतात..
अशा रघुराजाचे पराक्रमी स्वरूप,त्याची क्षमा आणि भक्तवत्सल अशी भूमिका आठवत ती आपल्या मनात कायम उतरवत ठेवावी.
समर्थ रामदास म्हणतात..
रघुराजाचे मनस्वी ध्यान तन,मनाने करत आपल्या आयुष्याचा हा मार्ग त्याच्याकडे घेऊन जाईल अश्या भक्तीच्या पायवाटेने कायम आपल्यासमोर उपासनेने सिंचित करत जावी.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment