समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*आनंदकंद रघुनंदन शोभताहे..|*
*कंदर्पकोटी वदनी उपमा न साहे..|*
*आकर्ण पूर्णनयनी रमणीय शोभा..|*
*विस्तीर्ण कीर्ण भुषणी जगदीश उभा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

तो रघुराज सर्व आनंदाचा गाभा आहे.ज्याच्या अस्तित्वातून सारे आनंदपथ निर्माण होतात..आणि ज्याच्या चरणाशी सगळे आनंदपथ शरण जातात.असा रघुनायक एका दैदीप्यमान आदर्शासारखा शोभून दिसतो आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अतिशय मुग्ध असे हे पुरुषी सौन्दर्याची एक खाण असलेला हा रामराय तो त्यांच्या सुहास्यवदनी,लाघवी असे स्वरूप दर्शन देतो.की ज्याची तुलना दुसऱ्या कशाशीही होत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचे मुखावलोकन करताना त्याचे पूर्ण मत्स्यनयन त्याच्या कानापर्यंत गेलेल्या रमणीय अशा प्रदेशाचे अत्यंत उत्कट असे दर्शन साध्य होते.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा रामराय आपलं हे आश्वस्त रूप घेऊन,तिन्ही त्रिकाळ हा जगनियंता जगाच्या कल्याणासाठी आपले आशीर्वादयुक्त वैभव दाखवत सदा दक्ष उभा आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment