*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*परमसुखनदीचा मानसी पूर लोटे..|*
*घननिळतनु जेंव्हा अंतरी राम भेटे..|*
*सुख परमसुखाचे सर्व लावण्य साचे..|*
*स्वरूप जगदिशाचे ध्यान त्या ईश्वराचे..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
सुखाची एक तरल लाट असते.जी मन समृद्ध करते.जी शरीर,अंतःकरण शुद्ध करते.जी एक निरामय वृत्ती तयार करते.आनंद निर्माण करते.
समर्थ रामदास म्हणतात..
ती लाट,तो ओघ म्हणजे घननिळ वर्णी शरीराराच्या रामप्रभुचे चिंतनात सगुण रूपाने येणे.राम सगुण रुपात मी करत असलेल्या संकीर्तनात येतो आणि निर्गुणरूपात मला दर्शनाची आवड निर्माण करून देतो.
समर्थ रामदास म्हणतात..
या श्रीरामाच्या अस्तित्वाचे,त्याच्या गुणांच्या स्तुतीचे,त्याच्या पराक्रमाच्या आरतीचे आंतरिक सुख मनामध्ये,विचारांमध्ये उचळंबुन येते.
समर्थ रामदास म्हणतात..
तेच रामाचे दर्शन हे त्या सर्वव्यापी जगदीश्वराचे रूप आहे.सर्व ब्रह्मांडाला व्यापून उरलेल्या निराकार,निरामय परमेश्वराचा तो सगुण असा वावर आहे.त्या परमेश्वराचे ध्यान,स्वरूप म्हणजे हा घननिळ रामच आहे.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment