समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांची साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*मधुकर मन माझे रामपादांबुजी हो..|*
*सगुण गुण निजांगे नित्य रंगोनि राहो..|*
*अचपळ गुणगुणी बैसली प्रीति दुणी..|*
*शरणचरणभावे जाहला राम ऋणी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझे मन हे रामाच्या चरणापाशी अतिशय आनंदी मानसिक अवस्थेत गढून आहे.हे गढून जाण हे सर्वोच्च अस सुख आहे हे ही मनाला प्रतीत होत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे कायम रामपादुकांशी रंगून गेलेलं मन कायम असेच निजानंदाचा सोहळ्यात रंगून राहो.आणि तो सोहळा आजन्म माझ्याभोवती साजरा होत राहो.

समर्थ रामदास म्हणतात..

कायम रामगुणांच संकीर्तन,मनन याने रामाबद्दलची आत्मीयता अजून वाढू लागली आहे.आणि त्याच संकीर्तनाच कायम मनन करण्यात मन धन्यता मानू लागलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या रामाच्या शरण्यभावाने जसा प्रत्येक पूजनीय त्याची पूजा करणाऱ्याच्या भक्तीत ऋणी असतो.तो त्याच्या भक्तीत, संकीर्तनात तल्लीन असतो तसा राम ही माझ्या या भक्तीत माझा ऋणसखा झाल्याचा भास होतो आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment