*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*तुझा भृत्य मी भार्गवादर्पजीता..|*
*जीवित्व असे अर्पिले तुज आता..|*
*भवा जिंकिता जीव देईन पाहे..|*
*तुज सन्मुख पाठिसी स्थिर राहे..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..तुला शरण येऊन मी तुझा दास झालोय.तू परशुरामासारख्या महावीराला त्याच गर्वहरण करून त्याला भक्त केलेस.तसच माझेही स्वतःबद्दलचे अनेक गैरसमज तू मोडून काढून मी तुझ्या दास्यतेचा बहुमान मिळवला आहे..!
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..अशी संपुर्ण शरणागती मी घेऊन तुझा कायमचा दास झालोय.माझं जीवपण तुझ्या चरणाशी अर्पण केल आहे.सर्वस्व अर्पण केल आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया.. माझं भवभय मी तुझ्या भक्तीने विसरून जातो.ते इतकं नगण्य वाटत की आयुष्यात तुझ्या संकीर्तनच्या बदल्यात जीवित्व सोडून द्याव अस वाटत.
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..जेंव्हा असा तुझ्या सन्मुख मी दास म्हणून उभा रहातो तेंव्हा एक चमत्कार घडतो.माझ्या सन्मुख असताना माझ्या पाठीशी एका विशाल आशीर्वादीत देवते सारखा उभा रहातोस.आणि मी निश्चिन्त होऊन जातो..!!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment