*जगदंबेचा शब्दजागर-१*

*जगदंबेचा शब्दजागर-१*

शैलपुत्री..!
जगदंबेच एक कोमल रूप..!
दक्षाच्या यज्ञसमयी पतीचा (शंकराचा) अपमान सहन न झालेल्या सतीने योगसामर्थ्याने स्वतःचा दाह करून घेतलेल्या या स्त्रीशक्तीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला..!

तीच ही शैलपुत्री..!

राखेतून स्वतःच प्रेम जाज्वल्य तेवत ठेवणारा मंदशाक्त हुंकार म्हणजे ही शैलपुत्री..!

हे रूप शब्दात वर्णन करायचं तर..
अभिमान रुपी मदांध वृत्तीरुपी वृषभावर स्वार होऊन त्याला आपल्या नियंत्रणात आणणारी ही स्त्रीवृत्ती म्हणजे ही शैलपुत्री..!

त्रिशूलाच्या तीन अग्रावर पतिरुपाने तापत्रयींच्या विकारी नजरा रोखणारी ही शैलपुत्री..!

पीतवस्त्रा मृगनयना एक सुदृढ अवतारीका म्हणजे ही शैलपुत्री..!

कमळाच्या कोशल अस्तित्वावर सुखाच दव पांघरणारी मातृशक्ती म्हणजे ही शैलपुत्री..!

हे स्वरूप स्नेहल मातृत्वाची एक ओळख...स्वतःला संपवून स्वतःच्या मनातलं पतिप्रेम आणि अभिमान जागवत ठेवणारी ही अनुरक्ता..!

सृष्टीउदयाच्या सुरुवातीला स्वतःच्या उदरात पूर्वीच्या  अवतारातील जन्माच झालेलं भस्म लपवून सृजनाचा कमलोदय देणारी ही भगवती म्हणजे शैलपुत्री..!

आई हा जागर तुझ्या चरणी अर्पण..!🙏
उदयोस्तु..!उदयोस्तु..!उदयोस्तु.!!

©प्रवीण कुलकर्णी, सातारा
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment