*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*वरुण वदन वापीमाजि जिंव्हास्वरूपी..|*
*मुख वसत तदापी वैखरी कोकीळापी..|*
*मधुर मधुर कुंजे नाम या राघवाचे..|*
*निववी वसत संती श्रोत्रयां सज्जनांचे..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
माझ्या जिभेच स्वरूप एखाद्या संतत धार असलेल्या पावसाच्या सरीसारखं सारख झालं आहे.तिच्यायोगी ही रामनामरूपी संतत धार एका पवित्र डोहासारखी माझ्यात साठू लागली आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
हे नाम माझ्या मुखातून येत खर पण ते इतकं माझं मलाच मधुर वाटत की एखाद्या कोकीळेने अतिशय सुस्वराने आलाप घ्यावा.आणि त्या बंदीशीची लयलूट या साऱ्या आसमंताने करावी.
समर्थ रामदास म्हणतात..
माझ्यात आणि माझ्याभोवती हे रामनाम निसर्गातून,अंतर्मनातून सदोदित इतकं ध्वनित होत त्यामुळे माझा देह,मन एक रामनामाचा गाभारा होऊन जाते.
समर्थ रामदास म्हणतात..
हे रामनाम प्रत्येकाचे मन,हृदय,शरीर निशांत करत जाते.जो कोणी संत या रामनामाचे संकीर्तन करतो,जो कोणी श्रोतृवृंद त्याचे श्रवण करतो,जो सज्जन या रामनामाचे मनन करतो हे सारे या नामसंकीर्तनाने स्वतः कृतार्थ होऊन जातात. मुक्त होऊन जातात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment