समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*वणवण ही विषयांची सर्वथाही शमेना..|*
*अनुदिन मोहमाया लागली हे तुटेना..|*
*झडकरी मज रामा सोडवी पूर्णकामा..|*
*तुजवीण गुणधामा कोण रक्षील आम्हा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

आयुष्यातले तापत्रय वाढवणारी ही विषयलोलुप वणवण..त्याची न संपणारी अतृप्त वखवख,रुक्ष भूक ही शांत होत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

प्रत्येक दिवशी नवीन मोह,नवीन वासना,नवीन मायेचे रूप..त्यातून जन्म घेणारे ऐहिक जन्ममरण याची साखळी तुटत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

आता मात्र रामराया तू सत्वर तुझी कृपा कर..तू ये आणि मला या वासना बंधनातून कायमचा मोकळा कर.मला तुझ्या पूर्ण अशा व्यक्तित्वात पूर्ण सामावून घे.

समर्थ रामदास म्हणतात..

आम्हाला मानसिक,शारीरिक त्राता तूच आहेस.तूच आमचा तारक आणि भवसागरातला वाहक आहेस.तुझ्याशिवाय कोणी हे करू शकेल असा समर्थ तरी कोण आहे..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment