समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विषयविष वमावे कल्पनेला दमावे..|*
*निजपद निजभावें दृढ चित्तीं धरावे..|*
*भवभय निरसावे साधुसंगी वसावे..|*
*सगुणभजन द्यावे स्वामी देवाधिदेवें..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

परमार्थाच्या दृष्टीने,सकल कल्याणाच्या दृष्टीने बाधक असा जो विषयसुख नावाचा एक हलहलाचा घोट आहे जो माझ्याकडुन घेतला जातो त्याचा माझ्याकडून शारीरिक,मानसिक त्याग होऊ दे..!अशा क्षणिक सुखांची कल्पना,वासना याचे चिंतन करण्याचा वीट मला येऊ दे..!

समर्थ रामदास म्हणतात..

एक असे अढळ निश्चिन्त जन्ममरणाच्या फेऱ्याला चुकवणारे मानसिक स्थान मिळवण्याचा कायमचा ध्यास या रामकृपेने मला मिळेल अशी कायम श्रद्धा मनात ठेवून तेच ध्येय असू द्यावे.

समर्थ रामदास म्हणतात..

भवभय नावाचे जे दुःख  उत्पन्न करणारे मनाचे खेळ आहेत ते सज्जनसंगत,साधूसंगत, गुरुसंगत या उपायांनी कायमचे आयुष्याच्या पल्याड सोडून केवळ रामभक्ती, संकीर्तन यासाठी या महानुभावांच्या संगतीत काळ व्यतीत करावा.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सर्व साधण्यासाठी हे रामराया मला सगुणभजन,संकीर्तन आणि भक्ती करण्याचा वसा मला आशिर्वाद रूपाने मला दे कारण तूच माझा कर्ता,पालनकर्ता असा स्वामी आहेस.कारण तू आम्हा सकलांचा देवाधिदेव आहेस.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment