*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*विगळीत मन माझे तू करी देवराया..|*
*हरिभजन कराया पाहिजे दृढ काया..|*
*निरूपण विवराया तर्कपंथेचि जाया..|*
*रघुपतिगुणछाया चित्त माझे निवाया..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया, तू माझे मन इतके निरिच्छ कर की ते त्रिगुणविरहित,वासनाहीन होऊन कल्पनाऔदासिन्याने भरून जाऊ दे.ते एक निश्चल असे बेट होऊ दे.
समर्थ रामदास म्हणतात..
हरिसंकीर्तन करायचे असेल तर मन आधी देवाचे झाले पाहिजे.त्यासाठी दृढतेने फक्त भक्तीची कास आणि आस अतिशय आग्रहाने माझ्या शरीराने,मनाने आपलीशी केली पाहिजे.
समर्थ रामदास म्हणतात..
देवलीला असलेल्या आगम-निगम कथा समजून घ्यायच्या तर निरुपणाचा वाचिक आणि श्रवणीक ध्यास हा असला पाहिजे.आणि त्याची तर्कसंगत मांडणी आणि विवेचन मनातल्या मनात करता आलं पाहिजे.आणि समाजामध्ये प्रभावी पद्धतीने मांडता आल पाहिजे.
समर्थ रामदास म्हणतात..
हे सगळे झाले की रामरायाच्या अनेक लिलायुक्त कहाण्या आणि त्यातून प्रतीत होणारे त्याचे गुणवैभव पाहून,ऐकून माझं मन एक शांत असा नदीचा प्रवाह होऊन जातो.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment