समर्थांच करुणाष्टक...
पाचवी पायरी..
पाचव कडवं...!
समर्थ म्हणतात...
चपळपण मनाचे मोडिता मोडवेना..
सकळ स्वजनमाया तोडीता तोडवेना....
घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा..
म्हणवून करुणा हे बोलतो दिन वाचा.......!
मन आणि त्याचा प्रवृत्तीचा निश्चित नेमका आचारबंध समर्थानी या कडव्यात मांडला आहे..!
मनाच्या अनेक गुणांपैकी चपळपण,अस्थैर्य,चंचलता हा गुण(?) जास्त आपल्याला अनुभवायला येतो..!
राममूर्ती समोर बसल्यावर चित्तासमोर,डोळ्यासमोर रामप्रभा असते,नक्कीच असते..!पण त्यावेळी आपलं हे मन...नजर आणि दर्शन याच्या पोकळीतून दूर कुठे तरी फिरून येत..!
एकदा मन चालल की मागोमाग भक्ती,त्यामागे भावना,त्यामागे नजर अस सगळंच चंचल होत..!
हजारो विचार,हजारो स्वप्न,हजारो अपेक्षा या ध्यानसमयी आपल्या भोवती फेर धरू लागतात..!
स्वतःची,आयुष्याची,आपल्या प्रियजनाची काळजी,ओढ,आठवण ही रामराय आणि आपल्यात दुराव्याची भिंत उभी करते..!
समर्थ हे कितीही विदेही असले तरी मनाची ही अवस्था त्यांनी साधनाकाळात नक्की अनुभवली होती.आणि म्हणूनच ते बारकाव्यासह या करुणाष्टकात त्याची रामरायासमोर प्रांजळ कबुली ही देतात..!
शुकासारखं वैराग्य प्राप्त करताना,उत्तम राजकारण शिकवताना,परमार्थ साधताना अश्या अनेक कसोटीच्या वेळा त्यांनी रामसाधनेत कशा बदलल्या हे समर्थ सांगताना आपल्याला ही गहिवरून येत..!
एकीकडे ही सगळी भावनिक आंदोलन,दुसरीकडे रामरायाची अतीव ओढ..यासगळ्या मध्ये रामचरणी शरण जात समर्थ कमालीचे करुणकोमल होतात..!
आणि हे भक्तीत ओथंबलेले कारुण्य रामचरणी मुक्तपणे रित करून समर्थ श्रीरामाना सांगतात की मी अतिशय दिनपणे या भावनिक,प्रापंचिक आंदोलनापुढे हतबल होऊन तुझ्याकडे राममयी होण्याची आशा धरून आहे..!
समर्थाची ध्यानबैठक,निग्रही भक्ती,रामाप्रती कोमल भावना..या सगळ्याचा परिपाक अष्टकाच्या या कडव्यात आपल्याला पाहायला मिळतो..!
श्रीराम..
©प्रवीण कुलकर्णी

No comments:
Post a Comment