समर्थाच करुणाष्टक...
सहावी पायरी...
सहाव कडवं....!
समर्थ म्हणतात....
जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी..
मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी..
तळमळ नीववी रे राम कारुण्यसिंधू..
षड्रिपुकुळ माझे तोड याचा समंधु..!
समर्थ कालातीत विचार करणारे संत..!
आपल्या तत्वज्ञानात सांगितलंय जन्म एक दुःखाच मूळ..!दुःखाच कारण..!
अनेक जन्माच दुःख साचलेलं असल्यामुळे या मनुष्यजन्माला आलो..!कोट्यावधी जन्म झाले..!
कोट्यवधी मरणे झाली..!
वेगवेगळ्या योनीतले तेवढेच सुख दुःखाचे अनुभव झाले..!प्रत्येक जन्मात त्या गजेन्द्रासारखा धावा करतोय की रामा मला या फेऱ्यातून सोडव..!
पण कदाचित माझं पुण्य कमी पडतंय..!
तुझ्या कृपेची,करुणेची दृष्टी माझ्याकडे वळत नाहीये..!
समर्थ म्हणतायत की मला माहितीये की तू एकदा ठरवलंस तर तुझ्या कृपेचा एक कटाक्ष माझ्यासाठी,माझ्यातल्या आत्मारामासाठी आत्मसुखाचा पूर होऊन येईल..!
कारण तो नीलकंठ ही तुझ्या नामाने शांत होतो..तर तो करुणेचा सागर होऊन तू माझ्यातला हा सुप्त वडवानल शांत करू शकणार नाहीस का?
माझे अस्तित्व माझ्या भोवतीच्या मायावी षड्रिपु चिखलात रुतले आहे..!तू जर तुझा करुणामयी हात दिलास तर माझे हे आयुष्य,हा जन्ममरणाचा फेरा माझ्यासाठी मोक्षदायी होईल..!
आणि ज्या या षड्रिपु कुळापायी हे जन्म मरणाच चक्र चालू आहे त्याच कारण,संबंधच तुटून जाईल..!
समर्थ रामाला हरप्रकारे विनवतायत..!जितक रामचरणापाशी शरण जाता येईल तितक जातायत..!
त्यांचा निग्रही रामदर्शनाचा हट्ट हा या करूणभावनेत मिसळून एक आदर्श रामदासी वृत्ती तयार होतीये..!
जी आपल्याला ही बाणवता आली पाहिजे..!
श्रीराम..
©प्रवीण कुलकर्णी

No comments:
Post a Comment