समर्थांच करुणाष्टक (२)
कडवे चौथे...
समर्थ म्हणतात..
तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले..
असंभाव्य ते कीर्ती बोलोनि गेले..
बहु धारणा थोर थकीत झालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!
रामराया...तुझ्या साठी आयुष्य टाकणारे,जीव प्राण याची पर्वा न करणारे,तुझ्या केवळ एका कृपाकटाक्षासाठी पूर्ण तहानभूक विसरणारे,देहात असून ही विदेही व्रत घेतलेले असे सगळे तुझे भक्त असंख्यात होऊन गेलेत..काही अजूनही माझ्या भोवती आहेतच..!
रामा..या सगळ्या भक्तांनी तुझ्याप्रति असलेल्या भक्तीचे अतिशय उंच आयाम त्यांनी निर्माण करत एकाहून एक कीर्तीयुक्त आदर्श निर्माण केले आहेत..!
हे आदर्श माझ्या सारख्या हीन भक्ताला केवळ अशक्यप्राय वाटतात..पण तरीही त्यांचं भक्तीयुक्त आचरण मला नेहमीच प्रेरणादायी ठरत..!
रामा ..त्या सगळ्या भक्तश्रेष्ठींची धारणा बघून माझं मन पुन्हा पुन्हा विस्मित होते आहे.मला माहिती आहे की रामराया..ही धारणा म्हणजे आतुरता,श्रद्धा आणि इच्छा यांचं सुंदर मिलाफ रूप आहे..!पण त्या धारणेचे सुंदर प्रकट असे हे भक्तराज पाहून मला त्यांच्या उंचीबद्दल खरोखर कौतुकमिश्रित आश्चर्य वाटतेय..!
रामराया...पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सगळं पाहून,अनुभवून माझ्या स्वतःच्या मानसिक आणि पारमार्थिक खुजेपणाची जाणीव होऊन मी भूमीला भार आहे अस वाटू लागले आहे..!
समर्थ त्यांच्या साधनकाळातली ही अनन्य शरणभक्ती विनयशील पद्धतीने आपल्यासाठी खुली करतायत..!
आपण आपल्या जन्माची व्यर्थता टाळायची असेल तर करुणाष्टकांची यथार्थता समजून घेतली पाहिजे ..हो ना?
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment