समर्थांच करुणाष्टक..
सातवी पायरी..
सातव कडवं...!
समर्थ म्हणतात...
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी...
शिणत शिणत पोटी लागली आस तुझी...
झडकरी झड घाली धाव पंचानना रे..
तुजवीण मज नेते जंबुकीं वासना रे...
रामा,माझे बाह्य त्रास,माझी बाह्य सुख दुःख मला सांगता येतील रे...!
आणि माझ्या भोवतीचे माझे या जन्मीचे सगे सोयरे ते ऐकतील ही..!
पण त्याचा कायमचा इलाज ते करू शकणार नाहीत याची मला जाणीव आहे..!आणि तुझी मला आस असल्याने मला तशी अपेक्षाही नाही..!
पण खरं सांगू ?
बाह्य जगात कुणाला सांगू न शकणारी,माझ्या मनात जन्मोजन्म साठत जाणारी अंतःव्यथा ही तुझ्या दिव्यदृष्टीलाच कळेल..!
रामा...ह्या तुझ्यापर्यंत न पोहचायच्या हतबल विचाराने मी पुरता गलितगात्र झालेलो आहेच पण तरीही तुझ्या कृपेची मला लागलेली आस शरीर थकत चालल तरी वाढत चाललेली आहे..!
रामा ..मला माहितीये पंचेंद्रियांना नियंत्रित करणार आणि त्यातील विकारांच संहार करणार पंचानन हे रूप तुझंच आहे..!तूच ते करू शकतोस..!तुझ्या येण्याने माझ्या विकार वासनांचा नाश होईल..आणि ती पंचेंद्रिये तुझ्या स्वरूपात येण्यासाठी शुद्ध होतील..!
पण रामा इतकी विनवणी करून सुद्धा तू येत नाहीयेस..माझी भक्तीची कमतरता मला जाणवतीये..!तस जर नसत तर माझ्या विकार,वासनांचा हा उच्छाद जंबुकासारख्या मुख असलेल्या या जन्ममरणाच्या मुखात परत परत ओढला गेला नसता..!
या सगळ्याला रामा तू आणि तूच नियंत्रित करू शकतोस.तूच या सगळ्यातून सोडवून मला तुझ्या सतस्वरूपात घेऊन जायचा मार्ग सुचवू शकतोस..!
रामराया खरंच अस करशील ना??
श्रीराम..
©प्रवीण कुलकर्णी

No comments:
Post a Comment