समर्थांचे करुणाष्टक...
पायरी आठवी..
कडवे आठवे...
समर्थ म्हणतात...
सबळ जनक माझा राम राम लावण्यकोटी..
म्हणवून मज पोटी लागली आस मोठी..
दिवसगणित बोटी ठेवून प्राण कंठी..
अवचट मज भेटी होत घालीन मीठी..!
समर्थांना जशी रामाची कारुण्यरूपाची प्रचिती आहे तशीच त्याच्या बळवंत अशा रूपाची ही माहिती त्यांना आहे..!
विराटसमाज पुरुषाच अस्तित्व असलेला,या समृद्ध भक्तांचा जनक असलेल्या या श्रीरामाच्या अनेक लाघवी प्रतिमांचा उल्लेख समर्थ आपल्या या आर्जवी प्रार्थनेत करतात..!
रेखीव पुरुषी लावण्याची व्याख्या ही समर्थ अजब पद्धतीने करतात..!
पुरुषी लावण्य तत्वनिष्ठ,सुचरित,सुसौष्ठवी असत..!काळजीवजा कर्तृत्व,कर्तव्यनिष्ठ प्रेम,वस्तुस्थितीमय वात्सल्य ही सगळी रूप पुरुषी लावण्याचीच आहेत.
दिवस दिवस वाचिक,मानसिक,शारीरिक तप करून घेणारा राम हा प्राणांतिक वाट पहायला लावतो खरा..पण जेव्हा तो रामस्वरूप करून घेतो तेंव्हा या सगळ्या भौतिक जाणिव,अपेक्षांच्या पलीकडे त्याने खुबीने आपल्याला पोहचवलेलं असत..!
हीच खरी रामाची खुबी..!
आयुष्याच्या या पारमार्थिक वाटचालीत हे रामराय आपल्याला अशा मुग्ध वाटेवर घेऊन जातात..की जिथे एका वळणावर ते आपल्यासाठी हात पसरून उभे असतात..!
आणि अशावेळी आपल्याला समजते की ज्याच्या समचरणाच्या मिठीला आपण बिलगु पहातोय तो राम आपल्याला आपल्यातच राहून बोलावतोय..कृपा करतोय..!
ही अवचट,अचानक भेट आपल्याला जीवनाची सार्थक करून देते..!
ही सार्थकता समर्थ पुन्हा पुन्हा रामाकडे मागतयात..!
आपणपण ती मागायलाच पाहिजे हो ना..?
श्रीराम..
©प्रवीण कुलकर्णी

No comments:
Post a Comment