समर्थांच करुणाष्टक १
कडवे १२
समर्थ म्हणतात..
सकळ जन भवाचे अखिले वैभवाचे..
जिवलग मग कैसे चालते हेचि साचे..
विलग विषमकाळी सांडिती सर्व भाळी..
रघुविर सुखदाता सोडावी अंतकाळी..!
एका नियोजित चाकोरीतून जन्म जगताना..भव आणी भय या दोन रेषामध्ये आपल मन आंदोलन घेत असत..!भवाची प्राप्ती ही समोरच्या अनेक लोकांकडून होते..तर भय त्या साऱ्यांच कारण सांगून मनातच उभे रहाते..!
भवामध्ये साथ देणारे त्या भवाच्या महिरपीच्या झगमगाटात स्वतःचा वाटा शोधत असतात..ते लोक ती कारण तेवढ्याच साठी असतात.. तात्पुरती..!
आणि अशा तात्पुरत्या संगाच वर्णन आपण जन्मोजन्मी असल्याचं फुशारकीने सांगतो..!
ही भोवतीची लोक ठराविक विषम,त्रासदायक,विषादाची वेळ आली की तुझं नशीब,तुझ्या प्राक्तनात हे अस म्हणून स्वतःच्या नात्याला त्यातून सोडवून घेतात..!आणि ते बरोबर ही आहे..!
आणि मग आठवतो रामा तुझा खरा आसरा..!तूच शेवटी या सगळ्या भवभयाच्या समुद्रातून शेवट पर्यंत तरून न्हेणारा अदृश्य नावाडी आहेस हे पटत..!
रघुवीरा..हे मला पटतय किंबहुना आलेल्या अनुभवावरून मला ते लक्षात येऊन शेवटी तुझी महनीयता मी जाणून घेतलीये..!
आपल्या कधी लक्षात येणार..?
श्रीराम..

No comments:
Post a Comment