रामआगमन
आजच्या दिवशी पुन्हा राम जन्म घेणार..!त्याच क्षणी कित्येक वर्षांनंतर समर्थजन्म..!
प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर अशी की गुरूशिष्याची जोडी..!एकाच दिवशी,घटिकेवर या विभूतींनी जन्म घ्यावा इतकं सुनियोजित सुकर्म नियती कशी करू शकते?
एक पुरुषोत्तम राम आणि दुसरा जनकल्याणी धाम..!
एक कारुण्य,बुद्धी आणी पराक्रमाचा आदर्श..तर एक कर्तृत्व, सिद्धी आणि निग्रही वृत्तीचा निष्कर्ष..!
समर्थानी रामाला आदर्श धरलं कारण शुचित देवत्व हे नेहमीच सुशांत असत..!
पूर्ण रामाच्या चरित्रात एखादा युद्ध प्रसंग सोडता राम चिडलेला कधीच सापडत नाही..!
राम हा उत्तम राजकारणी म्हणून ओळखला जात नसला तरीसुद्धा उत्तम राजा म्हणून ओळखला जातो..!हेच खरं रामाचं गूढ आहे..!
सीतेचे कोणतेही विशेष मनोरथ पूर्ण करण्याचे प्रसंग नसून सुद्धा राम एकपत्नी आणि प्रेमाचा आदर्श समजला जातो..!
कोणताही वेगळा प्रयत्न नाही..!केवळ चांगलं,विनम्र,शुद्ध वागून सुद्धा राम मनुष्याच आयुष्य देवगुणी जगले हे महत्वाच आहे..!
आणि समर्थ...
ते तर निग्रही तपस्वी,आग्रही शुद्ध मनस्वी आणि बलदंड भक्तीपूर्ण ओजस्वी होते..आहेत..!
संसार न करता उत्तम संसारी.. युद्ध न करता उत्तम योद्धा..बिरुद न लावता उत्तम कवी..प्रत्यक्ष राजकारण न करता उत्तम राजकारणी..कोणताही व्यवसाय न करता उत्तम व्यवहारी...कोणतीही अतिरेकी भक्ती न करता यशस्वी पारमार्थिक..!
हे सगळं तेजस्वी रामपण आणि समर्थपण एकाचदिवशी पृथ्वीतला वर याव हे पूर्ण चराचारा साठी भाग्याच लक्षण..!
आता प्रार्थना एकच..
ह्या गुरुशिष्याच्या आदर्श जोडीने हा हिंदुस्थान,हे विश्व रामराज्य करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा..!
इतकीच सहेतुक प्रार्थना..🙏🙏🙏
©प्रवीण कुलकर्णी

No comments:
Post a Comment