समर्थांची करुणाष्टके (३)
कडवे सहावे...
समर्थ म्हणतात..
दिनाचे उणे दिसता लाज कोणा..
जनी दास दीसे तुझा दैन्यवाणा..
सिरी स्वामी तू रामपूर्णप्रतापी..
तुझा दास पाहे सदा सीघ्रकोपी...!
रामराया..
माझी ही सगळी तुझ्या कृपेशिवाय झालेली विकल,अस्वस्थता समाजाला समजली तर तुझा सर्वसुखी दास अस बिरुद मी जे मिरवतो त्याची खंत तुला वाटणार नाही का..?
रामराया..असा तुझ्या सस्वरूपी दर्शनाशिवाय कायम अस्वस्थ असणारा मी,केवळ तृषार्त असा मी, समाजात अतिशय दैन्य,भणंग अवस्थेत फिरत असतो..आणि तो ही तुझा भक्त असून..हे तुला कमीपणा आणणार आहे ना रामराया...?
रामराया...तुझी कीर्ती,तुझं वलय,तुझी ओळख ही अखिल ब्रह्मांडात केवळ आणि केवळ सुखदायक,दुखनिवारक,पूर्णपराक्रमी अशी आहे..!
रामराया...या सगळ्या समाजातील माझ्या अवस्थेमुळे मी अस्वस्थ होऊन, माझी सहनशक्ती कमी होऊन उगीच छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करू लागलोय..!
समर्थ आता रामकृपेसाठी अतिशय काकुळतीला आलेल्या मानवी अवस्थेतली ही अवस्था वर्णन करताना रामाला त्याच्या कृपाकीर्तीची ही लाडिक आण घालू लागले आहेत.मातृत्वातल्या वात्सल्यापूर्ण गोंडस गळेपडू प्रेम ही आता लटक्या विषादात व्यक्त करू लागले आहेत..!
वात्सल्यात्मक प्रेम हेच भक्तीच निरागस रूप..हो ना..?
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment