समर्थांची करुणाष्टके (४)
कडवे दुसरे...
समर्थ म्हणतात...
तुझे रुपडे लोचनी म्या पहावे...
तुझे गुण गाता मनासी रहावे..
उठो आवडी भक्तीपंथेचि जाता..
रघुनायका मागणे हेचि आता...!
रामराया...सुंदर,मनोहर कुणाला आवडणार नाही?दृष्टीस पडावे ते फक्त लोभस,देखणे..!आणि या त्रिभुवनात शाश्वत रहाणार सुंदर अस तुझं दर्शन,तुझी प्रतिमा,तुझी प्रेमळ छबी आहे..आणि हेच माझ्या नजरेने पहायला मिळतंय हे भाग्य माझं आहे..आणि तेच मला कायम मिळाव अशी मनोकामना आहे..!
रामराया...तुझ्या या सावळ्या सर्वांगसुंदर दर्शनाने दिसत असलेल्या,आत पोहचत असलेल्या तुझ्या निर्मळ कथा,तुझ्या अगम्य लीला..ह्या सदैव माझ्या मनात ,विचारात असाव्यात..आणि त्या सगळ्या मला त्याच उत्कटतेने समोरच्याला समजावून देता याव्यात..!
रामराया...मला माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक सत्पुरुष,संत मला तुझ्या दर्शनाची,तुझ्या एकरूपतेची वाट दाखवणारा आहे..अशा वेळी मला कोणताही संदेह न मनात आणता त्या निर्देशित भक्तीच्या वाटेवर जाण्याची सहजबुद्धी प्राप्त व्हावी...!
रामराया...तुझ्याकडे येऊन तुला मागण्याच्या या हट्टामध्ये मी अनेक मागण्या करतोय..पण मी तुझ्याकडेच मागणार ना..?ते मागतोय...!!
समर्थांची कलादृष्टी, सौन्दर्यदृष्टी ही त्यांच्या साधनाकाळात ही तेवढीच उत्कट होती..!पण ही दृष्टी कुठे लावायची,कशी लावायची..हे समजवतात..!समजून घेऊ या आपणही..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment