समर्थांची करुणाष्टके (६)
कडवे सहावे.
समर्थ म्हणतात..
आहा रे विधी त्वा असे काय केले..
पराधीनता पाप माझे उदेले...
'बहुतामध्ये' चुकता तूक तुटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!
रामराया..माझे अदृष्ट लिहिणारा,त्याप्रमाणे प्रतिपाळ करणारा,माझं सौख्य बघणारा तूच आहेस..मग मला कळत नाहीये अस काय माझ्या भाळी लिहिलं आहेस की तु मला अजून भेटत नाहीयेस..!?
रामराया..माझं हे पराधीन अस जगणं हे कदाचित माझं पूर्वपाप याच फळ असेल का?की ज्यामुळे मला तुझ्याशी एकरूपतेचा सात्विक आनंद मिळत नाहीये..!
रामराया..या सगळ्याची परीक्षा मी तटस्थ पणे करतो तेंव्हा मला कळत की या तुझ्या कृपेच्या थोड्याश्या दिरंगाईमुळे समाजात ज्या अजाणते पणे चुका होतात त्याला ही समाजाकडून माफी मिळत नाही..!त्याकडूनही माझी उपेक्षा होते आहे.!
रामराया..या सगळ्याची परिणीती म्हणजे माझ मन जास्तीत जास्त मलूल,उदास होण्याकडे होत आहे..!आणि त्यामुळे मला माझी वाटचाल ही तशीच जाणवू लागली आहे..!
समर्थ आपली ही सारी भक्तीपंथातली, उपासनापंथातली वाटचाल सगळ्याबाजूने तपासून बघत आहेत.या मार्गात त्रुटी कोणतीही राहू नये आणि रामकृपा यथावकाश व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment