समर्थांची करुणाष्टके (६)
कडवे पाचवे.
समर्थ म्हणतात..
कृपाळूपणे भेट रे रामराया..
वियोगे तुझ्या सर्व व्याकूळ काया..
जनामाजि लौकिक हाही न सुटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे...!
रामराया...तू दयासागर आहेस,कनवाळू आहेस..!भक्तांच्या शुद्ध भावाला पावणारा आहेस.तुझी अशी दिगंत कीर्ती माझ्याबाबतीत खोटी का ठरतीये.?तू तुझ्या या दयावृत्तीने मला भेटून माझं आयुष्य सार्थकी लावण्यासाठी माझ्यावर कृपा करत नाहीयेस..?
रामराया..तुझ्या सगुणीमूर्तीत तू मला दिसतोसच..पण निर्गुणत्वाने ज्याची मला आस आहे..त्यासाठी मी माझं अस्तित्व पणाला लावलंय..ते जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी कमालीचा अस्वस्थ आणि अशांत असणार आहे..माझी काया,माझी वाणी ही व्याकुळ होत चाललीये..!
रामराया..हे सगळं असून सुद्धा समाजामधील माझी ओळख ही सुद्धा माझी उपाधी बनत चालली आहे.समाजाच्या अपेक्षाही मी पूर्ण करू शकत नाहीये.त्यापद्धतीने समाजाभिमुख अस माझं अस्तित्व होत नाहीये..!
रामराया...या सगळ्याची परिणीती ही माझं अस्तित्व,दिवस रात्र,माझं जगणं हे सगळंच अतिशय शोचनीय अवस्थेत पोहचू लागल आहे.जिथे केवळ अशांतता आहे..!
आयुष्याच्या त्या वळणाच समर्थ वर्णन करतायत जिथं रामाशिवाय प्रत्येक गोष्ट अपुरी आणि निरस वाटू लागते.ती अवस्था रामभेटीचा मुहूर्त जवळ आलाय याच द्योतकच आहे..!!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment