समर्थांची करुणाष्टके (५)
कडवे सातवे...
समर्थ म्हणतात...
प्रसंग वेळ तकेंना..
सुचेना दीर्घ सूचना..
मैत्रिकी राखता ये ना..
बुद्धि दे रघुनायका...!
रामराया...या आयुष्यात जगण्यासाठी प्रसंगानुरूप वागणे,रहाणे हे क्रमप्राप्त आहे.काळानुरूप सात्विक, बदल करण हे ही अपेक्षित आहे.त्याप्रमाणे ते आचारात आणण हे ही आलंच. पण भविष्याचा,आयुष्याचा कोणताही अंदाज न आल्यामुळे मला हे काहीच करता येत नाही.याशिवाय तू जे अनेकमार्गाने मार्गदर्शन करतोस त्याही सूचना मला अज्ञानतेमुळे कळत नाहीयेत.
समाजाशी,भोवतीच्या लोकांशी अगदी माझ्या स्वतःच्या मनाशीसुद्धा जुळवून घेणं,मैत्री राखण जमू शकत नाहीये..!
रामराया...अगदी सरळ सांगायचं झालं तर आयुष्यातली,नात्यातली,समाजातली सुसूत्रता मी हरवून बसलोय ती जुळवून देण्याची यथोचित बुद्धी तू मला देशील का रे..?
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment