समर्थांची करुणाष्टके (४)
कडवे सहावे
समर्थ म्हणतात...
भवे व्यापलो प्रीतिछाया करावी...
कृपासागरे सर्व चिंता हरावी..
मज संकटी सोडवावे समर्था..
रघुनायका मागणे हेचि आता...!
रामराया...माझ्या भोवतीची ही सारी आव्हाने,आकर्षणे याची वास्तवता मला प्रपंचात ओढतायेत,त्यातच मी गुंतत चाललोय..अशा सगळ्या ओढाताणीत तुझ्या सबळ सावलीची अपेक्षा माझी तुझ्याकडे आहे रे..!
रामराया..तू माझ्या या अनावश्यक मानसिक,शारीरिक धावपळीतून उत्पन्न होणारी होरपळ,चिंता दूर करण्यासाठी माझ्यावर कृपा करशील याची तुझ्याकडून अपेक्षा आहे..!
रामराया..या सगळ्यामुळे मी इतका कोंडीत सापडलोय,मी माझ्याच मानसिक कैदेत सापडल्यासारखा झालोय..या संकटातून मला सोडव रे...!
रामराया...या सगळ्या कृपेचा अखंड ओघ माझ्याकडे असू दे ही मागणी तुझ्याकडे वारंवार करतोय..!
समर्थ उपासनेत,भक्तीत रंगत जात असताना येणारी आकर्षणे आणि त्यातून सोडवणूकीच रामाला मागण याच वर्णन अतिशय तरलतेन आणि स्वच्छवृत्तीने करतात..हो ना..?
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment