समर्थांची करुणाष्टके (६)
कडवे आठवे.
समर्थ म्हणतात..
अखंडीत हे सांग सेवा घडावी..
न होता तुझी भेटि काया पडावी..
दिसेंदीस आयुष्य हे वेर्थ आटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!
रामराया..जन्माला येऊन तुझ्या संतत नामावलीच्या जपात,उपासनेत सदा लिन असावे.सदा तुझा विचार,तुझ्या कृपादृष्टीचा मागोवा घेत आयुष्य भक्तिमय व्हावे..!
रामराया...तुझ्या भेटीशिवाय जर या शरीरातले श्वास थांबले किंव्हा तुझ्या भेटीची अलोट इच्छाशक्ती असून शरीराने साथ दिली नाही..माझ्या शरीराने नश्वर अवस्था प्राप्त केली तर माझ्या या जीवनाची सार्थकता कशी होईल..?
रामराया..जशी जशी गात्र शिथिल होऊ लागली आहेत..तसे तसे आयुष्य पुढं सरकू लागले आहे.आणि तुझ्या सगुण दर्शनाचा योग अजून जवळ आला अस जाणवत नाहीये त्यामुळे हे जगणं केवळ असार आणि व्यर्थ आहे असे वाटू लागल आहे..!
रामराया..या सगळ्याची परिणीती माझं आयुष्य खूपच निरस होऊ लागलं आहे.आणि त्यामुळे मन हे उन्मनीत पण उदास होऊ लागलं आहे..!
समर्थ अहर्निश रामाच्या सेवेत,विचारात,उपासनेत आहेत पण साधनाकाळात येणाऱ्या मनुष्यसुलभ निकाराच्या दुश्चित्तपणाचा ही अनुभव त्यांना आहे त्याच वर्णन समर्थ आपल्यासाठी करत आहेत.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment