समर्थांची करुणाष्टके (६)
कडवे दुसरे...
समर्थ म्हणतात...
घरे सुंदरे सौख्य नानापरीचे..
परी कोण जाणेल ते अंतरीचे..
मनी आठवीताची तो कंठ दाटे..
उदासीन हा काळ कोठे ना कंठे..!
रामराया..पंचेंद्रियांना सुखकारक आणि ज्ञानेंद्रियांना केवळ स्वार्थात्मक सुख घेण्याची सवय लागलीये.घरीदारी असताना तीच माझी निकड आहे असा गैरसमज माझा झाला होता..!अशी सगळी सुख म्हणजेच आयुष्य असा एकप्रकारचा ग्रह मी मनात घेऊन जगत होतो..!
रामराया..पण ही सगळी भौतिक सुख असून सुद्धा ती मनापर्यंत पोहोचून पूर्ण,अविरत सुखात परावर्तित होत नाहीयेत.मला कळलंय की जे मनापर्यंत जातंय ते सुख मला समाधान देणार नाहीये.ते वेगळंच आहे.ते मिळाव म्हणून मला आत निर्माण झालेली रुखरुख मी कुणालाच सांगू शकत नाहीये.आणि ती तुझ्याशिवाय कुणाला कळेल अस मला वाटत ही नाहीये..!
रामराया..ही सगळी वस्तुस्थिती मला कळली आहे.आणि ती पटलीही आहे.एकप्रकारे मी हतबल आणि विरही झाल्यामुळे ईश्वरप्राप्तीची ओढ जाणवून..मला भरून येऊ लागते..!मी सद्गदित होऊन जातो..!
रामराया..अशा अवस्थेत वारंवार तो मनोहर संतसंग,तुझे चरण आठवून,ते अखंड,अविरत प्राप्त होत नसल्याने माझं आयुष्य जास्तीच उदासीन,निरस होऊ लागलं आहे..!
आपल्याला ही या सगळ्या अनुभवाची प्राप्ती होतच असते.पण विषयसुखाच्या आत्यंतिक ओढ आणि गोडी मुळे आपल्याला अजूनही प्राप्त न झालेल्या पारमार्थिक परमसुखाकडे आपण डोळेझाक करतो.आणि एका क्षणी पश्चाताप दग्ध होतो..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment